Amravati Dengue
Amravati DengueSaam tv

Amravati Dengue : अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला; १४ दिवसात आढळले ८८ रुग्ण

Amravati News : पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार पाय पसरत असतात. अमरावती शहर व जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून साथीच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ
Published on

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती शहर व ग्रामीण भागात साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मागील सात महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या १४ दिवसांमध्ये डेंग्यूचे तब्बल ८८ रुग्ण आढळून आले आहेत. सोबतच चिकुनगुनियाचे रुग्ण देखील वाढत आहेत. यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांमुळे धोक्याची घंटा वाजत आहे. 

Amravati Dengue
Supriya Sule : माझी पोलीस सुरक्षा तातडीने काढा, खासदार सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती, कारण काय?

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार पाय पसरत असतात. (Amravati) अमरावती शहर व जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून साथीच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ झालेली पाहण्यास मिळत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात मागील पंधरवड्यात तब्बल ८८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून (Dengue) डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षण असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. यासोबतच चिकुनगुनियाचे रुग्ण देखील वाढत असून सध्या जिल्ह्यात ५८ चिकन गुनियाचे रुग्ण सुद्धा आढळले आहेत. 

Amravati Dengue
Girlfriend Attack : लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसी संतापली; प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कापला, भिवंडीत खळबळ

कोरडा दिवस पाडण्याचे आवाहन 

अमरावती शहरात रुग्णांची संख्या अधिक वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता एक दिवस कोरडा दिवस पाळावा व डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. ताप आल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी; असे आव्हान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com