Palghar News
Palghar News  Saam TV
महाराष्ट्र

Palghar News : घरातून हसत खेळत कॉलेजला निघाली; पण वाटेतच मृत्यूने गाठलं, भरधाव ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

रुपेश पाटील

Palghar News : पालघर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना एका महाविद्यालयीन तरुणीला भरधाव ट्रेनने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी (२२ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

हंसी मुकेश सिसोदिया (वय १८ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. हंसी ही विरार मधील (Vasai Virar) यशवंत कुंज परिसरातील रहिवाशी असून ती पालघर (Palghar) येथील सेंट जॉन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती घरातून कॉलेजला निघाली. मी घरी लवकर येते असं म्हणत हंसी हसत खेळत घरातून बाहेर पडली.

यावेळी हंसीने बोरिवली वलसाड मेमोतून (Local Train) प्रवास केला. त्यानंतर हंसी पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर उतरली. रेल्वे ट्रॅक ओलांडून हंसी महाविद्यालयाकडे जात असताना, अचानक भरधाव वेगाने तेजस एक्सप्रेस आली. काही कळण्याच्या आतच ट्रेनने हंसीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये हंसी गंभीर जखमी (Accident) झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, रेल्वे पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने हंसीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. हंसीच्या अचानक निघून जाण्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: काँग्रेसचा बडा नेता गोत्यात, अकोल्यात गुन्हा दाखल; प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

SCROLL FOR NEXT