Cotton Price News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कापसाचे दर लवकरच वाढणार; आंतरराष्ट्रीय बाजारात आली तेजी

कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
Maharashtra Cotton Price News
Maharashtra Cotton Price News Saam TV
Published On

Krushi News : गेल्या वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Cotton Price News
Agniveer Bharti : तरुणांसाठी मोठी बातमी! अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल; आता 'या' उमेदवारांनाच मिळणार संधी!

देशात नगदी पिकांपैकी कापूस (Cotton Rate) हे प्रमुख पीक म्हणून ओळखलं जातं. मागील वर्षाच्या हंगामात कापसाला १३ ते १४ हजारांवर भाव मिळाला. म्हणून यंदाही शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीचा पेरा वाढवला. परंतु या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली अन् कापसाला ८ हजारांच्या जवळपास दर मिळू लागला.

अपेक्षेनुसार कापसाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र, अद्यापही कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं दरवाढीची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) मनात भीती निर्माण झाली. पण कापूस दरात जास्त नरमाई येणार नाही. कारण, गेल्या आठवड्यात कमी झालेले कापसाचे भाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे.

Maharashtra Cotton Price News
Pune Mahapalika Recruitment : खुशखबर! पुणे महापालिकेत होणार मोठी नोकरभरती; 'या' पदांसाठी करता येईल अर्ज

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची तेजी (Cotton Price) वाढली आहे, देशातल्या कापसालाही बांगलादेशातून मोठी मागणी होत आहे. तसेच चीनकडूनही कापूस खरेदीसाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या आठवड्यात कापूस बाजाराने काही उभारी घेतल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ८ हजारांवर असलेला कापूस बाजार भाव आता ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.

विदर्भातील कापसाचे पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कापसाचा भाव ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी बघता, यंदा कापसाचा सरासरी दर ८,५०० ते ९,५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com