Agniveer Bharti : तरुणांसाठी मोठी बातमी! अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल; आता 'या' उमेदवारांनाच मिळणार संधी!

Recruitment News: सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाकडून भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.
Agniveer Bharti 2023
Agniveer Bharti 2023Saam TV

Agniveer Bharti 2023 : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाकडून भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया आता नवीन निकषांवर होणार असून यामध्ये शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी लेखी प्रवेश परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Agniveer Bharti 2023
Pune Mahapalika Recruitment : खुशखबर! पुणे महापालिकेत होणार मोठी नोकरभरती; 'या' पदांसाठी करता येईल अर्ज

भारतीय सैन्यदलाकडून (Indian Army) ही माहिती देण्यात आली आहे. यापुढे अग्निवीर भरतीसाठी मानसिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येईल, असं सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत भारतील लष्करातील भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले, की सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची.

मात्र आता लेखी परीक्षा (Government Job) ही भरती प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे महत्त्वाचं असणार आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल, असंही लष्कर अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी सांगितलं आहे.

Agniveer Bharti 2023
Sanjay Raut News : खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत; कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुढे बोलताना कर्नल सुरेश म्हणाले, अग्निवीर भरती प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्य देणार आहे. तर उमेदवाराला फक्त 250 रुपये भरावे लागतील.

दरम्यान, अग्निवीर भरतीसाठी वर्षातून एकदाच ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सुधारित भरती प्रक्रियेनुसार, भरतीपूर्वी संगणकावर आधारित ऑनलाइन कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाईल. अग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. सध्या अग्निवीर म्हणून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com