School Girl Burnt Herself  Saam Tv
महाराष्ट्र

Palghar News: आश्रम शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतलं; धक्कादायक घटनेनं जव्हारमध्ये खळबळ

17 Year Ashram School Girl Burnt Herself In Jawhar: जव्हारमध्ये आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवल्याची घटना समोर आलीय. या घटनेमुळे आश्रम शाळेत मोठी खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

फैय्याज शेख, साम टीव्ही पालघर

पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आश्रम शाळेतील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवल्याची घटना घडलीय. जव्हारमध्ये ही घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यपाल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे आश्रम शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

काय आहे प्रकरण?

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देहरे (किरमिरा) या आश्रम शाळेत ही घटना (Palghar News) घडलीय. तेथे एका १७ वर्षीय युवतीने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विद्यार्थिनीचं नाव पायल आहे. पायल देहरे आश्रम शाळेत इयत्ता अकरावीमध्ये शिकते. काल २३ जुलै रोजी दुपारी पायल जेवण झाल्यानंतर ती शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली होती. तिथे पायलने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले.

आत्महत्येमागील नेमके कारण ?

ही घटना समजल्यानंतर आश्रम शाळेतील शिक्षकांनी तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं (Ashram School Girl Burnt) होतं. परंतु ही विद्यार्थिनी ९० टक्के भाजली गेली होती. त्यामुळे तिचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या आत्महत्येमागील नेमके कारण समजले नाहीये. परंतु, या घटनेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खळबळ माजली (Jawhar News) आहे. महत्वाचे म्हणजे राज्यपाल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडलेला आहे.

तालुक्यात मोठं संतापाचं वातावरण...

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्युमुळे तालुक्यात मोठं संतापाचं वातावरण (Ashram School Jawhar) आहे. रात्री ८ ते ९ च्या सुमारास ही घटना समोर आलीय. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहे. परंतु या युवतीने असं टोकाचं पाऊल का उचललं, हे अजून गुलदस्त्यातच आहे. आश्रम शाळेतील इतर विद्यार्थिनींमध्ये देखील गोंधळाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT