Burnt Milk Hacks : थांबा ! जळालेल्या दुधाला टाकून देताय ? स्वयंपाकघरातील या चार पदार्थांनी वाढवा चव

Kitchen Tips : दूध भांड्याला चिकटल्यानंतर त्याच्या उग्र वासामुळे आपल्याला त्याचा वापर करण्यासाठी देखील जीवावर येते.
Burnt Milk Hacks
Burnt Milk Hacks Saam Tv

Home Remedies For Burnt Milk : अनेकदा असे होते की, दूध उकळवताना कितीही काळजी घेतली तरी ते जळते. यामुळे आपण ते टाकून देतो. दूध भांड्याला चिकटल्यानंतर त्याच्या उग्र वासामुळे आपल्याला त्याचा वापर करण्यासाठी देखील जीवावर येते.

आपल्या स्वयंपाकघरातील (Kitchen) असे अनेक पदार्थ आहे ज्यामुळे आपण अनेक पदार्थांची चव बदलू शकतो. जळालेले दूध (Milk) आपण काही काळानंतर टाकून देतो. पण काही घरगुतीचा उपाय केल्यास आपल्याला त्याच्या उग्र वासापासून सुटका मिळू शकते.

Burnt Milk Hacks
Best Rice for Cooking : भात बनवण्यासाठी सर्वात चांगला तांदूळ कोणता?

परंतु, आम्ही तुम्हाला आज असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे जळलेल्या दुधाचा वापर तुम्ही करु शकता. त्याची चव व येणारा उग्रवास कसा कमी करुन तुम्ही ते दूध पिऊ शकता. स्वयंपाकघरातील असे काही पदार्थ आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही दुधाची चव वाढवू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

1. दुधाचे भांडे बदला

दूध जळाल्यानंतर आपण लगेच त्याचे भांडे बदलावे. यामुळे येणार उग्रवास व जळालेली चव कमी करण्यास मदत होईल.

Burnt Milk Hacks
Kitchen Hacks : फ्रीजचा वापर न करता टोमॅटोला अशाप्रकारे करा स्टोर, राहातील एकदम फ्रेश !

2. दालचिनी

जळलेल्या दुधाची चव बदलण्यासाठी तुम्ही त्यात दालचिनीच्या काड्या घालू शकता. यामुळे दुधाची चव बदलेल व त्यात एक गोडवा येईल.

3. वेलची

जळालेल्या दुधात २-३ वेलची घालून ते उकळल्यास त्याची चव बदलेल व उग्र वास देखील निघून जाईल. ज्यामुळे दूधात तयार झालेला पिवळा रंग देखील कमी होईल.

4. चॉकलेट पावडर किंवा हळद (Turmeric)

जळलेल्या दुधात गूळ, चॉकलेट, हळद किंवा केशर यांसारख्या गोष्टी घालून त्याचे चांगले पेय बनवता येते. हे पदार्थ दुधात जळलेल्या पदार्थाची चव कमी करण्यास मदत करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com