Eknath Shinde group  saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, पालघरचे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव संख्ये शिंदे गटात सामील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाळीचा झेंडा फडकावल्याने राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. या राजकीय भूकंपामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना मोठा धक्का बसला. एव्हढच नाही तर शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्यासह अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात सुरु असलेलं राजकीय युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये (vaibhav sankhe) यांनी शिंदे-फडणवीस युती सरकारला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खबबळ उडाली आहे. वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला पाठींबा जाहीर केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्यरत राहण्याचे निर्देश दिले. वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा दिल्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावेळी युवासेनेचे विस्तारक राहुल लोंढेही उपस्थित होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT