नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये मागील विश्वचषकाप्रमाणे १६ संघ सहभागी होणार आहेत. या टुर्नामेंटमध्ये ४५ सामन्यांचं आयोजन केलं आहे. टीम इंडियाचा (Indian cricket team) पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.
मागील विश्वचषकाचे आयोजन २०२१ मध्ये यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आले होते. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केलं होतं. यंदाच्या विश्वचषकाची सुरुवात १६ ऑक्टोबरला होणार आहे. परंतु, मैदानातील खरी लढाई २२ ऑक्टोबरला सुरु होणार आहे. त्यावेळी सुपर-१२ सामन्यांचा बिगुल वाजणार आहे. (T-20 world cup 2022 schedule)
टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. ही टुर्नामेंट एकूण तीन स्टेजमध्ये खेळवण्यात येणार आहे. यामध्ये राऊंड १,सुपर-१२ आणि प्ले ऑफ सामन्यांचा समावेश आहे. यामधील ८ संघांनी ग्रुप १२ स्टेजसाठी क्वालिफाय केलं आहे. तर उर्वरित ४ संघ क्विलिफिकेशन राऊंड जिंकून जागा पक्की करणार. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ४-४ संघांचे दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये टॉप-२ राहणारा संघ सुपर-१२ पर्यंत पोहचणार. त्यानंतर सुपर-१२ स्टेजमध्ये ६-६ संघांचे दोन ग्रुप असणार आहेत. यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये असणारे टॉप-२ संघ सेमीफायनल मध्ये जागा पक्की करणार.
राऊंड - १
ग्रुप A : श्रीलंका, यूएई, नेदरलॅंड, नामेबिया,
ग्रुप B : आयरलॅंड, स्कॉटलॅंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज
सुपर -१२
ग्रुप १ : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप A विनर, ग्रुप B रनर-अप,
ग्रुप - २ : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप-A रनर-अप, ग्रुप - B विनर
कसा असेल पॉईंट टेबल सिस्टम?
आयसीसीने या टी-२० विश्वचषकासाठी पॉईंट टेबल सिस्टमची घोषणा केली आहे. प्रत्येक संघाला जिंकल्यानंतर दोन गुण मिळणार आहेत. पराभव झाल्यानंतर शून्य गुण मिळणार आहेत. जर सामना टाय झाला किंवा रद्द झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण दिलं जाईल. जर ग्रुपमध्ये दोन्ही संघांचं गुण समान झाले, तर या सिस्टमनुसार निर्णय घेतला जाईल की, त्या संघांनी टुर्नामेंटमध्ये किती सामने जिंकले आहेत. त्या संघाचा नेट रनरेट काय होता आणि त्यांचा काय रेकॉर्ड राहिला आहे, हे तपासलं जाईल.
एकूण सात मैदानांवर होणार सामने
टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये एकूण ४५ सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये क्वालिफाईंग राऊंडचे सामने होबार्ट आणि जिलॉंगमध्ये खेळवले जाणार आहेत. तर सिडनी, मेलबर्न, पर्थ, एडिलेड आणि ब्रिस्बेन सुपर-१२ स्टेजसाठी सामन्यांची मेजवानी करणार. सेमिफायनलचा सामना एडिलेड ओवल आणि सिडनी क्रिकेटच्या मैदानात खेळवला जाईल. तर अंतिम सामना १३ नोव्हेंबर २०२२ ला मेलबर्नच्या क्रिकेट मैदानात होणार आहे.
टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाचे सामने
भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर, दुपारी १.३० वाजता, (मेलबर्न)
भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, २७ ऑक्टोबर, दुपारी १२.३० वाजता, (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, सायंकाळी ४.३० वाजता (पर्थ)
भारत विरुद्ध बांग्लादेश, २ नोव्हेंबर, दुपारी १.३० वाजता, (एडिलेड)
भारत विरुद्ध ग्रुप बी विनर, ६ नोव्हेंबर, दुपारी १.३० वाजता (मेलबर्न)
टी-२० विश्वचषक २०२२ चा संपूर्ण शेड्युल
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.