palghar news Saam tv
महाराष्ट्र

Ashok Dhodi kidnap Case : भावानं काढला भावाचा दृश्यम स्टाईल काटा; फिल्मीस्टाईल हत्येचं 12 दिवसांनंतर उलगडलं गूढ, VIDEO

Ashok Dhodi kidnap Case palghar : भावानं भावाचा दृश्यम स्टाईल काटा काढला....भावाचंच अपहरण करून हत्या केली आणि १२ दिवस पोलिसांना कसा चकवा दिला त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Girish Nikam

अजय देवगण, तब्बूचा गाजलेल्या दृश्यम या थ्रिलर, सस्पेन्स सिनेमाची आठवण यावी असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची हत्या त्यांच्या भावानंच केल्याचं उघड झालंय. या क्रूर, चलाख भावानं अगदी दृश्यम स्टाईल काटा काढला आहे.

20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पालघर पोलिसांना 12 दिवसानंतर यश आलं. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी यानं अपहरण केलं आणि हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं. गुजरातच्या भिलाड परिसरातल्या ४० फूट खोल पाण्यानं भरलेल्या दगडाच्या खदानीत कारसह अशोक धोडींचा मतृदेह ढकलून दिला.

'पकडलेल्या आरोपींनी खदाणीची माहिती दिली, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. आरोपी अविनाश धोडीचा दारू तस्करीचा धंदा होता. या धंद्यात भाऊ अशोक अडचणीचा ठरत होता. म्हणूनच अविनाशनं भावाची हत्या केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत.

त्यामुळे फरार आरोपींपासून जीवाला धोका असल्याची भीती अशोक धोडींचा मुलगा आकाश यांनं व्यक्त केलीय. दृश्यमस्टाईल आपल्या भावाला संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. मात्र संपत्तीसाठी जीवावर उठल्यामुळे भावाच्या नात्यालाच काळीमा फासला गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT