पालघरमधून गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले आहे. गुजरातमधील भिलाड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात ४० फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने अशोक धोडी यांची हत्या केल्याचे तपासातून उघड झालं आहे.
२० जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना १२ दिवसानंतर यश आलं . मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं. गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि कार थेट ४० फूट खोल पाण्यात ढकळली. १२ दिवसानंतर पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या कारचा शोध घेण्यात यश आलं. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह कारसह बाहेर काढला.
१९ जानेवारी -
अशोक धोडी कामानिमित्त मीरारोडला गेले
२० जानेवारी -
डहाणू रेल्वे स्थानकावर उतरून ब्रीझा कारमधून घरी निघाले
२० जानेवारी -
पत्नीला फोन करून घरी येत असल्याचं कळवलं
२० जानेवारी -
संध्याकाळपासून अशोक धोडी बेपत्ता
२२ जानेवारी -
धोडींच्या कुटुंबाकडून घोलवड पोलिसात तक्रार
२७ जानेवारी -
अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश मुख्य संशयित आरोपी
२७ जानेवारी -
अविनाश धोडी पोलिसांच्या हाती तुरी देऊन निसटला
२९ जानेवारी -
४ संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक
२९ जानेवारी-
५ फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना
३० जानेवारी -
आरोपींकडून धोडींचं अपहरण आणि हत्या केल्याची कबुली
३१ जानेवारी -
भिलाडमधील बंद दगड खाणीत धोडींचा मृतदेह सापडला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.