Palghar news Saam tv
महाराष्ट्र

Palghar : रेल्वे प्रवासात महिलेवर हल्ला; क्षुल्लक कारणातुन झालेल्या वादातून केला शस्त्राने वार

Palghar news : मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या ॲड. शितल भोसले या ३ मे रोजी आपल्या इंदोर येथे शिकत असलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी निघाल्या होत्या. या महिलेने अवन्तिका एक्सप्रेसमधून प्रवास सुरु केला होता

रुपेश पाटील

पालघर : मुंबईहून सुटलेल्या अवन्तिका एक्सप्रेसमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादातून एका जमावाने महिलेवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सदर महिला मुंबईहून मुलांना आणण्यासाठी इंदोरला जात होती. या प्रवासादरम्यान हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

लग्नसराई आणि सुट्यांच्या कालावधी असल्याने रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. रिझर्व्हेशन डब्यांमध्ये देखील प्रचंड गर्दी असल्याने या गर्दीत प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशातच मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या शितल भोसले या  ३ मे रोजी आपल्या इंदोर येथे शिकत असलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी निघाल्या होत्या. या महिलेने अवन्तिका एक्सप्रेसमधून प्रवास सुरु केला होता. यात रेल्वे पालघर स्टेशनवरून सुटल्यानंतर वादाला सुरवात झाली. 

किरकोळ वादातून हल्ला 

हातामध्ये असणाऱ्या रुद्राक्षमाळेच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेवरील अवंतिका एक्सप्रेसमध्ये सुरू झालेला वाद चिघळून महिलेवर महिला व एका सहकारी पुरुषाने धारदार वस्तूने वार केला. तसेच महिलेला मारहाण व हल्ला करण्यात आला. यानंतर सदर महिलेने हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यानंतर महिलेला वलसाड येथे उतरवण्यात आले. यानंतर उपचार केल्यानंतर पालघर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  

चार जणांना घेतले ताब्यात 

वादातून महिलेला मारहाण करून तिच्या हाता पायावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये महिला जखमी झाली आहे. दरम्यान या प्रकरणी पालघर लोहामार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना वापी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT