Maharashtra Politics: Vijay Wadettiwar Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

'दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ नाही, सरकार लोकांना भरकटवतंय', काँग्रेस नेत्याचा आरोप; फडणवीस म्हणाले 'जखमेवर मीठ..

Vijay Wadettiwars Comments on Pahalgam Attack Spark Controversy: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली, यावर मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Bhagyashree Kamble

काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलित झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. २२ एप्रिलला घडलेल्या या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. 'दहशतवादी हल्ला करतावेळी लोकांशी बोलत बसतील का? धर्म विचारत बसतील का? सरकार लोकांना भरकटवतंय, असा आरोप वडेट्टीवारांनी केला. यावर मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मोदी सरकार नेमकं काय करत होतं?

विजय वडेट्टीवार म्हणाले, 'सत्ताधारी लोक भारत पाकिस्तान असा जप करत बसतात. पहलगाममध्ये घडलेल्या हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. हे सरकारचं अपयश आहे, हे त्यांनी स्वीकारावं. मुख्य म्हणजे काश्मीरच्या खोऱ्यात सुरक्षा का नव्हती? तेथील सुरक्षा व्यवस्था का हटवण्यात आली होती? अतिरेकी सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसलेच कसे? त्यावेळी मोदी सरकार नेमकं काय करत होतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो

विजय वडेट्टीवार म्हणाले, पहलगाम हल्ल्यावर सरकारमधील कुणीच काहीही बोलायला तयार नाही. हे लोक (सत्ताधारी) काय बोलतात, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारलं. मुळात दहशतवाद्यांना यासाठी वेळ होता का? पर्यटकांच्या जवळ जाऊन, त्यांच्या कानात बोलायला, त्यांना धर्म विचारायला वेळ होता का? काही लोक म्हणतात धर्म विचारले, तर काही म्हणतात असं काहीच घडलेलं नाही, मुळात दहशतवाद्यांचा धर्म किंवा कुठलीही जात नसते', असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सरकारने लोकांना भरकटवू नये

विजय वडेट्टीवारांनी, सरकारने मूळ मुद्यावरून लोकांना भरकटवू नये असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी दहशतवाद्यांसह या कटात सामील असलेल्या लोकांनाही पकडून त्यांच्यावरही कारवाई करा, हीच देशातील सर्व नागरिकांची भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'खरंतर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन, मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे. आपण नातेवाईकांचं म्हणणं माध्यमांद्वारे ऐकलं. प्रत्यक्षदर्शींनीच सांगितलं की धर्म विचारला होता. त्यावेळी त्या ठिकाणी वडेट्टीवार होते का? इथे बसून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं अतिशय वाईट आहे', असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT