...अन्यथा औरंगाबाद उद्योगनगरीची नव्हे; 'क्राईम कॅपिटल'ची ओळख बनेल! SaamTv
महाराष्ट्र

...अन्यथा औरंगाबाद उद्योगनगरीची नव्हे; 'क्राईम कॅपिटल'ची ओळख बनेल!

गृहमंत्रीसाहेब, औरंगाबादमधली गुन्हेगारी आताच रोखा; नाहीतर आपल्या औरंगाबादची ओळख बिहारमधल्या औरंगाबादसारखी होईल.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : उद्योगनगरी आणि पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादची ओळख आता 'क्राईम कॅपिटल' होतेय की काय अशी भिती वाटतेय. कारण भर दिवसा लूट, हल्ला आणि खून होण्याचे प्रमाण वाढले आहे त्याला आळा घालण्यात पोलिस प्रशासनाला हवं तस यश मिळताना दिसत नाही त्यामुळे आता औरंगाबामध्ये थेट गृहमंत्रीसाहेबानी लक्ष घालावं अशी विनंती केली जात आहे.Otherwise Aurangabad is not an industrial city; It will be known as 'Crime Capital

हे देखील पहा-

गृहमंत्रीसाहेबHomeminister औरंगाबादमधली गुन्हेगारी Aurangabad Crime आताच रोखा; नाहीतर आपल्या औरंगाबादची ओळख बिहारमधल्या औरंगाबादसारखी होईल. कारण औरंगाबाद शहरात भर दिवसात लूट-मारहाण, अत्याचारासोबतच क्रूरतेने भर रस्त्यात खून करणाऱ्या घटनांनी कळस गाठलाय. तर दुसरीकडे पोलीस आयुक्त बैठकीत आणि पोलीस अधिकारी गुन्हे घडल्यांनंतरच्या कारवाईत बिझी आहेत आणि शहरात गुन्हेगारी मात्र वाढत आहे.

८ ऑगस्टच्या सायंकाळी औरंगाबाद शहरातल्या सिडको CIDKO परिसरातील न्यू हनुमान नगरमध्ये २१ वर्षाच्या आकाश राजपूतला Akash Rajput निर्घृणपणे ठेचून मारण्यात आलं. भर रस्त्यात मस्तवालपणे लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. त्यात एका निष्पापाचा बळी गेला. पण भर दिवसा, भर रस्त्यात गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांचे कुठलेही भय राहिले आहे का नाही हा प्रश्न सामान्य औरंगाबादकराला पडला आहे.

आता शहरातील नागरिकांचा संताप वाढला. अफगाणिस्तानातAfgnistan जशी तालिबानीTaliban आपली क्रूरता दाखवत आहेत, त्यापेक्षा भंयकर औरंगाबादमध्ये दिसतंय, त्यामुळे शहरात संतापाची लाट उसळत आहे.

दरम्यान एकाच आठवड्यात दोन उद्योजकांवर हल्ला, पेट्रोल पंपावर भरदिवसा लूट आणि ही भर रस्त्यात अमानुष हत्या त्यासोबतच दररोज घडणाऱ्या चोरी लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढ वाढतायत. मग याला कोण जबाबदार असा प्रश्न औरंगाबादवाशियाना पडलाय. जर हे असंच सुरू राहिलं तर उद्योगनगरी आणि पर्यटन राजधानीची ओळख पुसून 'क्राईम कॅपिटल' म्हणून ओळख व्हायला अधिक काळ लागणार नाही. त्यामुळे गृहमंत्रीसाहेब, पुढचा धोका आधीच ओळखून गुन्हेगारांचं भय संपवून टाकायला तुम्ही पुढाकार घ्या अशी मागणी केल्याशिवाय पर्याय नाही.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT