कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर, कारण...

कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा (State President post) कार्यभार स्वीकारला. पण पाच महिने होऊन ही अजून नवीन कार्यकरणी जाहीर झालेली नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी हवालदिल झाले आहेत.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर, कारण...
कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर, कारण...

कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा (State President post) कार्यभार स्वीकारला. पण पाच महिने होऊन ही अजून नवीन कार्यकरणी जाहीर झालेली नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी हवालदिल झाले आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जाहीर झाल्याबरोबर कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली.

सहा कार्यकारी अध्यक्ष, 14 उपाध्यक्ष नेमणूक झाली, पण प्रत्यक्षात काम करण्यासाठी कार्यकारणी नसल्याने कॉंग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.कार्यकारिणीत सरचिटणीस,सचिव, जिल्हाध्यक्ष कार्यकारी सदस्य यांचा सहभाग असतो. यांची पाच महिने होऊनही नेमणूक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येत असताना अजून कार्यकरणी गठीत न केल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहेत.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर, कारण...
Supreme Court: भारताला मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश

दरम्यान, ४ फेब्रुवारी २०२१ रोजी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. टिळक भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com