Majalgaon Nagarpalika  SaamTvNews
महाराष्ट्र

माजलगाव पालिकेतील बोगस कामांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

कोट्यवधी रुपयांच्या बोगस कामाची चौकशी करून, अभियंता व लेखापाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

बीड : बीडच्या (Beed) माजलगाव नगरपरिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कामाची चौकशी करून, अभियंता व लेखापाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथील सहायक संचालक नगरपरिषद शशिकांत भोसले यांनी हा आदेश दिला आहे. याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी तक्रार केली होती. (Beed Majalgaon Latets News)

हे देखील पहा :

शासनाची फसवणूक (Fraud) व जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. त्यामुळे संबंधित अभियंता व लेखापाल यांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करुण सदर रक्कम वसूल करून घ्यावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अरुण राऊत यांनी केली होती. या तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून, जिल्हाधिकारी यांना नियमानुसार कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

यापूर्वी माजलगाव (Majalgaon) पालिकेत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोन गुन्हे नोंद आहेत. नपचे तत्कालीन तीन मुख्याधिकारी व तीन लेखापाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर नगराध्यक्षावर ही अटकेची कारवाई झाली होती, आता त्यानंतर काल आलेल्या आदेशामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT