अमृतसर: पाच राज्यात पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी त्या राज्यांतील प्रदेशाध्यांचा राजीनामा मागितला होता. गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर या राज्यातील अध्यक्षांनी राजीनामा दिला, परंतु पंजाबचे अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. परंतु मंगळवारी त्यांनी सोनिया गांधींना एका ओळीत लिहून आपला राजीनामा दिला. आता अशा अफवा पसरत आहेत की सिद्धू पुन्हा एकदा शो आणि क्रिकेट कॉमेंट्री क्षेत्राकडे वळू शकतात.
पक्षांतर्गत कलहामुळे पंजाबमधील राजकारण चांगलेच तापले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यावेळी सिद्धूंचे नावही चर्चेत होते. पंजाबमधील या अंतर्गत कलहात सिंद्धूंचे नऊ महिने वाया गेले, पक्षासाठी आणि लोकांच्या फायद्याची काहीच कामं करता आली नाहीत. माध्यमांशी बोलायला सिद्धूंनी सतत नकार दिला.
नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे. 2017 मध्ये 77 जांगावर असलेली काँग्रेस 2022 मध्ये 18 जागांवर आली आहे. आम आदमी पक्षाने तिथे आपले वर्चस्व सिद्ध करत 92 जागा निवडून आणल्या आणि सत्ता स्थापन केली. राजकारणातील नवशिक्या जीवन ज्योत कौर यांनी नवजोत सिंग सिद्धूंचा अमृतसर मतदार संघातून पराभव केला. 2004 मध्ये भाजपाने नवजोत सिंग सिद्धूंना अमृतसर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांचा राजकारणाचा आणखी एख खराब अध्याय लिहीला जात होता.
सिद्धूंच्या पराभवानंतर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसमधून नाराजीचा सुर उमटत आहे. खादूर साहिबचे काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी "पक्षाच्या नेत्यांच्या अहंकाराला जबाबदार धरले आहे, तर माजी कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंग बाजवा यांनी सिद्धू यांना "असमानता आणि अनुशासनहीनता" साठी जबाबदार धरले आहे.
माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रार यांचे सल्लागार असलेले राजकीय विश्लेषक मनोहर लाल शर्मा म्हणाले की "राजकारणात कोणतेही उज्ज्वल भविष्य नसलेले, सिद्धूंनी पुन्हा क्रिकेट समालोचनाला सुरुवात करावी. काँग्रेस कदाचीत त्यांनी आता चांगले पद देईल असे वाटत नाही. आणि इतर पक्षातही त्यांना जागा नाहीये.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.