Maharashtra cabinet approves OBC reservation sub-committee under Devendra Fadnavis’ leadership. saam tv
महाराष्ट्र

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

OBC Sub-Committee Forms: महाराष्ट्र सरकारने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य असलेली समिती स्थापन करण्यात आलीय. ओबीसी आरक्षण उपसमिती स्थापन करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

Bharat Jadhav

  • ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करण्यास अखेर मंजुरी मिळाली.

  • महायुतीतील प्रत्येक पक्षातून दोन सदस्य या समितीत असतील.

  • ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

अनेक दिवसांपासून ओबीसी समाजासाठी उपसमितीची स्थापना करावी असा प्रस्ताव देण्यात आला होता. २-३ कॅबिनेटमध्येही हा प्रस्ताव आला परंतु ३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसमिती गठित करण्यास मंजुरी देण्यात आली.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झालाय. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच भाग म्हणून उपसिमिती तयार करण्यात आलीय. या समितीत महायुती सरकारमधील प्रत्येक पक्षातील २ सदस्य असणार आहेत. ओबीसी समाजाची उपसमिती नेमकं काय काम करणार हे जाणून घेऊ.

उपसमितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे

१) इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असलेल्या राज्य शासनाच्या विविध योजनांचे परिक्षण करणे. त्यासंदर्भात उपाययोजना सुचवणे.

२) इतर मागासवर्गीय समाजासाठी घोषित केलेल्या योजना तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत इतर मागासवर्गीय समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे. ते संनियंत्रण करणे.

३) राज्य शासनाने आपल्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये व पदांवर (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सांविधिक आणि निमसरकारी संस्था यातील नेमणुका धरून) इतर मागासवर्गीयांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उपाययोजना करणे.

४) इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवर विचारविनिमय करणे.

५) इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणविषयक प्रशासकीय व वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणे.

६) या संदर्भातील न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवणे, विशेष समुपदेशींना सूचना देणे.

७) मा. न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती ठरविणे.

८) इतर मागासवर्गीय समाजातील आंदोलक व त्यांचे शिष्टमंडळाशी चर्चा करणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT