Maratha-OBC Reservation: पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली; मराठा-ओबीसी मुद्दा तापला, देवगिरीवर खलबतं

Reservation Politics Maratha-OBC Dispute: मराठा-ओबीसी आरक्षणा वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झालाय. ओबीसी नेत्यांनी जीआरला विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झालाय.
Maratha/OBC Reservation
Reservation Politics Maratha-OBC Disputesaam tv
Published On
Summary
  • सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला.

  • मराठा-ओबीसी आरक्षण वादामुळे राष्ट्रवादी पक्षात दुफळी.

  • देवगिरी बंगल्यावर महत्त्वाच्या बैठका सुरू.

राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचा जीआर काढल्याने राज्यातील ओबीसीमध्ये अस्वस्थता वाढलीय. ओबीसी नेते आक्रमक झाले असून मराठा आरक्षणाविरुद्धात कोर्टात धाव घेणार आहेत. त्यामुळे राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापणार असल्याचं चित्र दिसत आहे. इतकेच नाही तर मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षांमध्येच दोन गट तयार होताना दिसत आहेत. मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दुफळी निर्माण झालीय.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी पाठिंबा दिला होता. अनेक नेते जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. मात्र भुजबळांनी ओबीसी समाजाला धरून आक्रमक भूमिका घेतली तर येणाऱ्या निवडणुकांवरती याचा थेट परिणाम होऊ शकतो. कारण पक्षामध्ये ओबीसीविरुद्ध मराठा नेते अशा पद्धतीचे चित्र निर्माण होऊ शकतं. याच अनुषंगाने आता देवगिरी बंगल्यावरती ही सगळी खलबतं सुरू आहेत.

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ गैरहजर राहिले होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलवलीय. अजित पार यांच्या सरकारी निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर ही बैठक होत आहे. भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संभाव्य अडचणी लक्षात घेत देवगिरी बंगल्यावर बैठक घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Maratha/OBC Reservation
Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरलीय. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सरकारने उपसमितीची गठीत केली. आता ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळाने उपसमिती स्थापन करण्याला मान्यता दिलीय. पण मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते नाराज झाले आहेत.

Maratha/OBC Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली

दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी पक्षात मोठ्या हालचाली घडत आहेत. भुजबळ यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

भुजबळ यांनी पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीत ओबीसी आरक्षण प्रश्नी होतं असलेल्या अन्यायाबाबत उघड भूमिका घेतली. यानंतर वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय. जर छगन भुजबळांनी ओबीसी समाजाची बाजू घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली, तर पक्षातील अनेक आमदार आणि मराठा नेते हे सुद्धा आक्रमक भूमिका घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com