Prakash Anna Shendge On OBC Reservation Saam Tv
महाराष्ट्र

OBC Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर OBC समाजाचा एल्गार; विधानसभेच्या २८८ जागा लढवणार

Prakash Anna Shendge On OBC Reservation: आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव आज नागपूर येथील बैठकीत ओबीसी संघटनांनी मंजूर केला.

साम टिव्ही ब्युरो

पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर प्रतिनिधी

नागपूरात आज ओबीसी संघटनाची विदर्भ स्तरावर बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी संघटनानी विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव ओबीसी संघटनांनी मंजूर केला आहे.

तसेच नव्याने 57 लाख मराठ्यांची ओबीसीमध्ये नोंद केली आहे, ती नोंद खत्री कमिशनच्या आधारावर करण्यात आली असून ती आम्हाला मान्य नाही, म्हणत त्या सगळ्या नोंदी रद्द कराव्या, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीत प्रकाश अण्णा शेडगे यांच्यासह ओबीसी संघटनांशी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांना बोलवण्यात आले नव्हते.

बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाबद्दल माहिती देताना ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेडगे म्हणाले की, या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवाव्यात, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. सगेसोयरे जीआर काढू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा ओबीसी नेत्यांनी सरकारला दिला आहे.

प्रकाश अण्णा शेडगे म्हणाले आहेत की, सरकराने नव्याने घेतलेल्या 57 लाख नोंदी रद्द कराव्यात. शिंदे समिती बरखास्त करावी आणि नव्याने नोंदी घ्यावी. राष्ट्रीय स्तरावर जातनिहाय जनगणना करावी. केंद्राने केली नाही तर ती बिहारच्या धर्तीवर राज्यात करावी, अशी मागणी करण्यात आली.

बैठकीतील ठरावाबद्दल माहिती देताना शेडगे पुढे म्हणाले की, ''वेगळ्या विदर्भासह छोट्या राज्याची निर्मिती करावी. मराठा समाजाला दिलेला निधी त्याचा दुप्पट महाज्योतीआणि मंडळाला द्यावा. विदर्भात हाके आणि ससाणे आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे.'' यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितलं आहे की, आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनात मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण निदर्शने आंदोलन केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT