नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लावण्यात आली होती
सीसीटीव्ही तपासणीद्वारे आरोपी विश्वंभर तिरुखे याची ओळख पटली
मनोज जरांगे यांचा समर्थक असल्याचा नवनाथ वाघमारे यांचा दावा
पोलीसांनी आरोपीला केली अटक, पुढील तपास सुरु
अक्षय शिंदे , साम टीव्ही
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पेटवली होती. जालन्यातील नीलमनगरमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कार पेटवणाऱ्या आरोपी विश्वंभर तिरुखे याला अटक केली आहे. विश्वंभर तिरुखे हा मनोज जरांगे यांचा समर्थक असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
जालन्याचे पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितलं की, 'जालन्यातील नीलमनगरमध्ये 21 सप्टेंबर रोजी रात्री १० ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवनाथ वाघमारे यांची कार ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आली होती. यामध्ये कारचं ४० ते ४५ हजार रुपयांचं नुकसान झालं. तक्रार मिळाल्यानंतर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणानंतर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानंतर विश्वंभर तिरुखे याने गाडी जाळण्याचे समोर आले. आम्ही त्याला अंबड चौफुली येथे अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी कोर्टात हजर करणार आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केलं आहे'.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं की, 'खरंतर पोलिसांनी शर्थीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अतिशय निकटवर्तीय असलेल्या विश्वंभर तीरुखेला ताब्यात घेतलं आहे. नारायण गडावर दोघांनाही एक माळ टाकलेली होती, असं म्हणत त्यांचा फोटो माझ्याकडे मोबाईलमध्ये उपलब्ध आहे,असं सांगत तिरुखे हा मनोज जरांगे यांचा समर्थक असल्याचा पुरावा वाघमारेंनी दिला.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार पेटवण्यात आली होती. नवनाथ वाघमारे यांची कार कॉलनीत उभी होती. त्यांच्या कॉलनीत गुपचूप शिरून तिरुखे याने कार पेटवली होती. त्याने आधी संपूर्ण कारवर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर आग लावून दिली. या आगीने कारचं कव्हर जळून खाक झालं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय. या प्रकारानंतर नवनाथ वाघमारे यांनी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.