Pune Politics : पुण्यात 'ड्रोन शो'वरून ड्रामा; वसंत मोरेंच्या पोस्टनंतर भाजपकडून टीकास्त्र

Pune Political News : पुण्यात 'ड्रोन शो'वरून ड्रामा सुरु झालाय. वसंत मोरे यांच्या पोस्टनंतर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
pune news
Pune Political NewsSaam tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य 'ड्रोन शो' आयोजित केला होता. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच पुण्यात या कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले. या 'ड्रोन शो'वरून ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. मोरेंच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची कामगिरी यासोबतच पुण्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमातून दाखवण्यात आला होता. आता हा कार्यक्रम संपन्न होऊन ३ दिवस झाल्यानंतर आता याच कार्यक्रमावर टीका होऊ लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट या खर्चाचे हिशोब मांडत खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टोमणा मारला आहे.

pune news
Shocking : नदीवर पोहोयला गेले अन् विपरित घडलं; ४ मित्रांची ठरली शेवटची आंघोळ

'१००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च येतो. त्यात इतर व्यवस्थापनाचा खर्च धरला, तर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या रकमेतून पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती मोठे काम झाले असते, याचा विचार तरी केलाय का?" असा टोला लगावला.

ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी सोशल मीडियावरूनही खासदारांवर टीका केली. “ड्रोन शोबाबतच्या पोस्टवर नागरिकांनी केलेल्या असंख्य नकारात्मक कमेंट्स खासदारांनी डिलीट करण्यासाठी माणसे बसवली होती, असा आरोप त्यांनी केला. 'माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मी १००० गोरगरिब लोकांच्या मूळव्याधचे ऑपरेशन केले. तुम्ही जनतेला गृहीत धरता का? असं ही मोरे यांनी एका व्हिडिओच्या मार्फत टीका केलीय.

pune news
Boyfriend Girlfriend : दोघात तिसरा...! तरुणाच्या आयुष्यात दुसरी तरुणी आली, प्रेमात अडथळा ठरलेल्या गर्लफ्रेंडला संपवलं

आता पुण्याच्या खासदार यांच्यावर टीका केली म्हणाल्यावर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार आहेत का? आज सकाळपासून ट्विटर, फेसबुक आणि इतर सर्व सोशल मीडियावर पुणे शहर भाजप कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांना पुणेरी शब्दात उत्तर दिलंय.

एका कार्यकर्त्याने एक पोस्ट करत, "काही दिवसांनी वसंत मोरे be like - मुरली अण्णा, सॉरी माझं चुकलं पण मला भाजपात घ्या" अशी टीका केली तर दुसऱ्या बाजूला भाजप चे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी तर चक्क एक लेख च लिहला आणि त्याला शीर्षक दिलं "बेडूकउडी वसंत, पुणेकरांची नापसंत. "लोकसभेत उमेदवारी मिळाली तर डिपॉझिट जप्त, आमदारकीचं स्वप्न पाहिलंस पण तेही फसलं. मुद्द्यांना वजन द्यायला तू पात्र नाहीस, म्हणून बातमी होते ती तुझ्या मतांमुळे नाही, तर तुझ्या विनोदी भूमिकेमुळे," असं सुद्धा या पोस्ट मध्ये लिहलंय.

pune news
India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

वसंत मोरे हे त्यांच्या आक्रमक भाषण आणि भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत शिवाय आता दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी सुद्धा त्यांच्या पोस्ट वर पुणेरी शाल जोडे मारतायत. या सोशल मीडिया वॉर मधूनच आगामी महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम आहे की काय असा प्रश्न मात्र आता उपस्थित झाला आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com