
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या पार्वती नदीत आंघोळीला गेलेले ७ मुले पाण्यात बुडाली. त्यातील ४ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने पोलीस आणि जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
आंघोळीला गेल्या ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाला. चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडताच एसडीआरएफ-एनडीआरएफचं पथक रवाना झालं. राजस्थानमधील खतौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. चारही जण अल्पवयीन असल्याचं बोललं जात आहे.
नदीत बुडणाऱ्या मुलांची नावे देखील समोर आली आहेत. सोनू सुमन, मोहित सुमन, अशफाक, आयुष गुर्जर असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. एसडीआरएफची कंपनी कमांडर एकता यांनी माहिती देताना म्हटलं की, ७ अल्पवयीन मुले आंघोळीसाठी नदीत उतरले. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने सातही मुले पाण्यात बुडाले. त्यातील तिघे पोहत काठावर पोहोचले. तर या नदीत ४ लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला.
इटावा डीएसपी शिवम जोशी यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर कोटा जिल्ह्यातील ग्रामीण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राम कल्याण मीणा घटनास्थळी रवाना झाले आहेत.
नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. बळीरामपूर भागातील 15 वर्षीय शेख बाबर आणि 16 वर्षीय मोहम्मद रेहान या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दोघे मित्र कंधार येथे फिरण्यासाठी गेले होते. परत येताना किवळा येथील तलावावर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी गेले होते. मात्र, फोटो काढताना पाय घसरून दोघेही तलावात बुडाले. रात्री उशिरा या दोन्ही मुलांचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.