Nylon Manja Sale In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nylon Manja: नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला; बंदी असूनही नायलॉन मांजाची सर्रास होते विक्री

Nylon Manja Sale In Nashik: नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे. नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. हा नायलॉन मांजा किती घातक आहे पाहा या रिपोर्टमधून जाणून घेऊ.

Girish Nikam

नाशिकमध्ये नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एक तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडले आहेत. हा नायलॉन मांजा किती घातक आहे पाहा या रिपोर्टमधून. संक्रात सण जवळ येतो तसा पंतगबाजीचा उत्साह ठिकठिकाणी पहायला मिळतो.

उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेकजण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पंतगाला असलेल्या नॉयलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होतायेय. नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे. तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे. या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे.

त्याच्या गळ्याला 75 टाके पडले आहेत. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. संक्रात सण जवळ येतो तसा पंतगबाजीचा उत्साह ठिकठिकाणी पहायला मिळतो. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेकजण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पंतगाला असलेल्या नॉयलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होतायेय.

नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे. तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे. या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या गळ्याला 75 टाके पडले आहेत. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय.

एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावरच कोसळला. मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी होतेय.

राज्यात अशा किती घटना घडल्यात ते पाहूया

नायलॉन मांजाचे बळी

नाशिक- 1 मृत्यू, 16 जखमी

मुंबई

2 मृत्यू, 4 जखमी

भंडारा

1 मृत्यू

छत्रपती संभाजीनगर

50 जखमी

नागपूर

40 जखमी

काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे आणि जीवघेणे रसायन डिंकात मिसळून हा घातक मांजा तयार करतात. छत्रपती संभाजीनगर शहरात तर नायलॉन मांजा विकला तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिलाय. अशीच कडक कारवाई इतर शहरातही अपेक्षित आहे. नायलॉन मांजाचा कायमस्वरूपी वापर रोखण्यासाठी प्रभावी कारवाई बरोबरच जनजागृतीचीही गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT