Nylon Manja : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल; नंदुरबार, प्रकाशामध्ये पोलिसांची कारवाई

Nandurbar News : पतंग उत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. असे असताना देखील नंदुरबारमध्ये पतंग उत्सवासाठी लागणाऱ्या दोरा तयार करण्याची लगबग सुरू असून कारागिरांचा हाताला वेग आलेला आहे
Nylone Manja
Nylone ManjaSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: मानवी शरीरास अपायकारक आणि बंदी घातलेला नायलॉन आणि चाइनीज मांजा विकायला बंदी असतानाच छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री केली जात आहे. अशाच प्रकारे छुप्या पद्धतीने नंदुरबार व शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ६२ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. तर विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पतंग उत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. असे असताना देखील नंदुरबारमध्ये पतंग उत्सवासाठी लागणाऱ्या दोरा तयार करण्याची लगबग सुरू असून कारागिरांचा हाताला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे नायलॉन आणि चायनीज मांजा हा घातक ठरत असल्याने हा मांजा विक्री व वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील यांची विक्री होत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. 

Nylone Manja
Red Chilli Price : मिरचीच्या दरात मोठी घसरण; नंदुरबार बाजार समितीत आवक वाढल्याचा परिणाम

६२ हजाराचा मांजा जप्त 

गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली असून बंदी असलेला नायलॉन मांजा अवैधरित्या विकणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. नंदुरबार शहर आणि प्रकाशा या गावात छापे टाकत एकूण ६२ हजार ५७० रुपयांचा १८८ लहान मोठे बंडल पोलिसांनी जप्त केलेले आहे. बंदी असताना देखील सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या माणसावर पोलिसांची करडी नजर असून गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत ३ जणांविरुद्ध नंदुरबार शहर आणि शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Nylone Manja
Ambarnath MNS : अंबरनाथमधील रिक्षाचालकाच्या मृत्यूवरून मनसे आक्रमक; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दररोज तयार केला जातोय ६० हजार मीटर कॉटन मांजा
पतंग उत्सवाला काही दिवस बाकी असताना नंदुरबारमध्ये पतंग उत्सवासाठी लागणाऱ्या दोरा तयार करण्याची लगबग सुरू असून कारागिरांचा हाताला वेग आलेला आहे. नायलॉन मांजाला बंदी असल्यामुळे नंदुरबारमध्ये कॉटन माजाची मागणी वाढली आहे. विविध रंगांचे कॉटन मांजा तयार करण्यात येत आहेत. दररोज ६० हजार मीटर कॉटन मांजाची निर्मिती केली जात असून २०० रुपये ते २ हजार रुपयेपर्यंतचे विविध प्रकारचे दोरे तयार करण्यात येत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com