Ambarnath MNS : अंबरनाथमधील रिक्षाचालकाच्या मृत्यूवरून मनसे आक्रमक; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ambarnath News : अंबरनाथ पश्चिमेतून जाणाऱ्या कल्याण- बदलापूर राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आहेत या खांबांना धडकून अनेक अपघात झाले असून काही जण गंभीर जखमी झालेत तर काहींचा मृत्यू झाला
Ambarnath MNS
Ambarnath MNSSaam tv
Published On

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकून अपघात झाला होता. या अपघातात आरिफ शेख या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान रिक्षा चालकाच्या मृत्यूला एमएमआरडीए, महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केली आहे.

अंबरनाथ पश्चिमेतून जाणाऱ्या कल्याण- बदलापूर राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध असल्याचे पाहण्यास मिळतात. या खांबांना धडकून आजवर अनेक अपघात झाले असून त्यात काही जण गंभीर जखमी झालेत, तर काहींचा मृत्यूही झाला आहे. यामुळे रस्त्यात असलेले खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही अनेक वर्षांपासून त्याकडे एमएमआरडीए, महावितरण आणि अंबरनाथ पालिका दुर्लक्ष करत आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल गायकवाड यांनी केला आहे. 

Ambarnath MNS
Miraj Crime : महालक्ष्मी मंदिरांत चोरी; दान पेटीसह देवीचे आभूषण केले लंपास

मनसे आक्रमक 

काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ पश्चिमेच्या मेटल नगर परिसरात राहणाऱ्या आरिफ शेख या रिक्षा चालकाचा याच खांबाला धडकून अपघात झाला होता. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा एकदा रस्त्यातले हे खांब काढण्याच्या मागणीने जोर धरला आहे. दुसरीकडे अनेक वर्षांपासून या खांबांकडे दुर्लक्ष करणारे एमएमआरडीए, महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी हे देखील आरिफ शेख, तसेच आजवर मृत्यू झालेल्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केला आहे. 

Ambarnath MNS
Red Chilli Price : मिरचीच्या दरात मोठी घसरण; नंदुरबार बाजार समितीत आवक वाढल्याचा परिणाम

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

रिक्षा चालकाच्या मृत्यूच्या घटनेनंतर आता महावितरण, एमएमआरडीए आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी अंबरनाथचे तहसीलदार आणि अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेत केली आहे. याबाबत उपोषणाला बसणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com