Radhakrishna Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Temple: शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क, नो दर्शन'; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले...

Radhakrishna Vikhe Patil: देशात गेल्या २४ तासांत संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, केरळ, तेलंगणा, गोवा, महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळली आहेत. याचपार्श्वभूमीवर साई संस्थान अलर्ट मोडवर आले असून नो मास्क मो दर्शनाचा नियम लागू केलाय.

Bharat Jadhav

(सचिन बनसोडे)

No Mask No Darshan At Shirdi Sai Temple :

देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देवस्थानांच्या ठिकाणी दक्षता घेतली जात आहे. शिर्डीतील साई मंदिरात विना मास्कशिवाय दर्शनाची परवानगी देऊ, नये अशा सुचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थानाला दिलेत. (Latest News)

गेल्या २४ तासांत संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, केरळ, तेलंगणा, गोवा, महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. कर्नाटकमध्ये कोरोनाचा (corona) नवा व्हेरियंट जेएन-१ चे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात नवे ३४ प्रकरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभूमीवर साई संस्थान (Sai Sansthan) अलर्ट झाले असून साई मंदिरात 'नो मास्क नो दर्शन नियम लागू केला जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साईंच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येत असतात. त्यामुळे सतर्कता म्हणून साई मंदिरात हा नियम लागू करण्यात येणार आहे. याविषयीच्या सुचना पालकमंत्री (Guardian Minister) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी साई संस्थानाला सुचना दिल्या आहेत. मंदिरात आलेल्या भाविकांना संस्थानकडून मास्क पुरवले जावेत. मंदिराच्या बाहेर नो मास्क नो दर्शनचा मोठा बोर्ड लावावा अशा सुचना दिल्याचं विखे-पाटील म्हणाले. संस्थानाने याची तातडीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मास्क पूरवण्यामध्ये कोणता मोठा खर्च नाहीये. भाविक दर्शन रांगेत लागल्यानंतर त्यांना मास्क द्यावा, असं विखे-पाटील यांनी सांगितले.

जरांगे पाटलांना मुंबई येण्याची गरज नाही

यावेळी विखे-पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. महायुती सरकार आरक्षण देणार याची मराठा समाजाला खात्री आहे. पण जरांगे-पाटील यांची भूमिका धरसोडपणाची दिसते. जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्यामुळे आरक्षण गेलं त्यांच्या घरावर मोर्चा न्यावा, असं आवाहन विखे पाटलांनी मनोज जरांगेंना दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT