Covid Throat Infection : बापरे! कोरोनाची लागण झाल्यानंतर १५ वर्षीय मुलीचा आवाजच गेला; कुठे घडली घटना?

Covid 19 Causes : कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोरं आले आहे. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली होती.
Covid Throat Infection
Covid Throat InfectionSaam tv
Published On

Covid -19 Infection :

कोरानाचा वाढत्या आजाराने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. या JN.1 च्या नव्या व्हेरिएंटमुळे देशात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कोरोनाचा नवा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

अशातच कोरोनाच्या (Corona) नवीन लक्षणांमध्ये (Symptoms) घशाची खवखव होत असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोरं आले आहे. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली होती.

अमेरिकेतून असेच एक प्रकरण समोर आलं आहे. कोविड -१९ मुळे एका १५ वर्षाच्या मुलीचा आवाज गेला आहे. अमेरिकेतील एका रुग्णालयात १३ दिवसांपूर्वी या चिमुकलीला दाखल करण्यात आले होते. तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं, तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती. यानंतर हळू-हळू तिचा आवाज गेला.

Covid Throat Infection
Corona Variant JN.1 Cases : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, घराबाहेर पडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला वाचा

एंडोस्कोपिक चाचणीत असे दिसून आले की, तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस झाला आहे. याबाबत अधिक रिचर्स केला तो मासाचुसेट्स आय अँड इअर हॉस्पिटलमधील संशोधकांनी. यामध्ये पॅरालिसिस किंवा इतर आजारामुळे (Disease) झाला नाही तर कोरोनामुळे तिचा आवाज गेल्याचे निदान झाले आहे.

पीडियाट्रिक्स वृत्तामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच द हिंदूने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात होताना दिसून येतं आहे. यामध्ये मुलांना दम्याची लक्षणे सर्वात आधी दिसून येत आहेत. यामध्ये कोरोनाचे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Covid Throat Infection
Corona Variant JN.1 : कोरोनाची चौथी लाट येणार?, पुढचे २-३ आठवडे महत्वाचे; तज्ज्ञांचे मत काय?

सध्या या मुलीवर उपचारांसाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली. मात्र तरीही तिचा आवाज परत आला नाही. यानंतर तिच्या शस्त्रक्रिया करुन श्वसननलिकेत छिद्र करण्यात आले, ज्यामुळे तिला पुन्हा आधीसारखा श्वास घेता येऊ लागला आहे. अजूनही तिच्यावर उपचार सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com