Corona Cases In Hingoli: कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून ठोकली धूम; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Hingoli Corona Patient: धक्कादायक म्हणजे शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू असताना वॉर्डमधील परिचारिका आणि डॉक्टरांची नजर चुकवून हा रुग्ण पसार झाला आहे.
Corona Cases In Hingoli
Corona Cases In HingoliSaam TV
Published On

Hingoli News:

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित आढळलेल्या एका ज्येष्ठ रुग्णाने उपचार सुरू असताना पळ काढला आहे. 24 तासांपासून हा रुग्ण गायब झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलेये. या प्रकारानंतर हिंगोली पोलिसांनी तातडीने या रुग्णाचा शोध घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत हा रुग्ण नेमका कुठे गेला याची माहिती मिळू शकलेली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Corona Cases In Hingoli
Corona in India: काळजी घ्या! देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ, ६ राज्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक

धक्कादायक म्हणजे शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू असताना वॉर्डमधील परिचारिका आणि डॉक्टरांची नजर चुकवून हा रुग्ण पसार झाला आहे. यानंतर आता हा रुग्ण वास्तव्यास राहत असलेल्या परिसरात देखील डॉक्टरांच्या पथकामार्फत देखील शोध घेणे सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची सध्या वाढताना दिसतेय. त्यामुळे सर्वांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने ज्या व्यक्तीला याची लागण होईल त्याने कॉरंटाइन होणे गरजेचे आहे. मात्र सदर रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये देखील नव्या जेएन.१ व्हेरिएंटने या नव्या व्हेरिएंटचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला जेएन.१ व्हेरिएंटची प्राथामिक लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांना आहे. सध्या संशयित महिलेला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

राज्यभरात ९ रुग्णांची नोंद

रविवारी दिवसभरात राज्यात जेएन.१ विषाणूचे तब्बल ९ रुग्ण आढळून आले आहेत. नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी ८ आठ रुग्णांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

Corona Cases In Hingoli
Tamil Nadu Crime: डोक्यात शिरलं प्रेमाचं भूत; इंजिनीअर मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी लिंग बदललं; तिलाच साखळीने बांधून जिवंत जाळलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com