Indurikar Maharaj Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Nivrutti Maharaj Indurikar Slams Political Leaders: निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे अकोल्यात किर्तनसेवा पार पडली. या किर्तनात बोलताना महाराजांनी धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहणाऱ्या नेत्यांना फटकारत तरुणाईलाही अशा प्रवृत्तींना बळी न पडण्याचा संदेश दिला आहे

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, अकोला|ता. १९ सप्टेंबर

Nivrutti Maharaj Indurikar Kirtan: निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची किर्तने महाराष्ट्रभर गाजत असतात. राजकारण, समाजकारण, संसार, व्यसनमुक्ती अशा अनेक विषयांवर ते आपल्या किर्तनातून भाष्य करत असतात, तरुणांना फटकारत असतात. नुकतेच निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे अकोल्यात किर्तनसेवा पार पडली. या किर्तनात बोलताना महाराजांनी धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहणाऱ्या नेत्यांना फटकारत तरुणाईलाही अशा प्रवृत्तींना बळी न पडण्याचा संदेश दिला आहे.

काय म्हणाले इंदोरीकर महाराज?

निवृत्ती महाराज इंदोरीकर त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सध्या निवडणुकीच्या हंगामात राजकीय नेत्यांनी त्यांच्या किर्तनाचा धडाका लावला आहे. नुकतेच अकोल्यामध्ये त्यांचा किर्तनसोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी धर्माच्या नावावर दंगली घडवू पहात तरुणाईचा वापर करू पाहणाऱ्या नेत्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. त्यांच्या या किर्तनाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

"आज दंगलीच्या कॅमेरात दिसले की 10 वर्षाची शिक्षा, म्हणून दंगलीच्या भानगडीत पडू नका. ज्यांनी आयुष्यभर पोर भोंगे बांधायला वापरून घेतले, ते आज युवकांना नोकरीचे मार्गदर्शन करत आहेत. आज सगळे कारखाने आणि शाळा मार्गदर्शन करणाऱ्यांचेच आहेत, असे म्हणत नोकरी महोत्सवात किती तरुणांना नोकऱ्या लागल्या?" असा सवालही इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून उपस्थित केला.

'मी' मेलो तरी तुम्ही सुधारणार नाही, आहे तोपर्यंत बदल होणार नाही. पण आपण गेल्यानंतर तुम्हाला आठवण येणार पाया पडतो, कळकळणीने सांगतो, माझे वाक्य नुसते पुस्तकातून नव्हे, अनुभवाचे आहे. एखादा म्हणेल तुम्हाला धर्माचा ईमान नाही, तुमचा धर्म माईकवर आहे आणि आमचा हृदयात आहे. तुम्ही स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करू नका, धर्म म्हणून आमच्या गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका, अशा शब्दात त्यांनी राज्यकर्त्यांना फटकारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Level: ब्लड शुगर टेस्ट करताय, तर या कॉमन चुका लगेच टाळा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

NPS Rule Change: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NPS च्या नियमात बदल, आता ८० टक्के रक्कम एकरकमी काढता येणार

Plane Crash : खासगी विमानाचा भयंकर अपघात, दिग्गज खेळाडूसह अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

SCROLL FOR NEXT