Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Maharashtra Politics: महायुतीमधील वाचाळवीर आमदारांमुळे महायुती संकटात अडकलीय. फडणवीसांच्या वक्तव्यामुळे आमदार बेछूट विधानं करत आहेत.
Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ
Maharashtra Politics
Published On

झंके, साम प्रतिनिधी

राजकारणात दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा,असं अभिमानानं म्हटलं जातं. पण सध्या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या सशक्त राजकीय वातावरणाला लाज आणली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कोण आहेत राज्यातील बेताल त्रिकुट.. जे स्वताच्या नेत्यांसोबतच महाराष्ट्रातील जनतेला लाजवतायेत. पाहूया

मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा. फक्त हिट विकेट होऊ नका असं देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपुर्वीच म्हटलं होतं.. पण तिथेच माशी शिंकली आणि फडणवीसांच्या याच वक्तव्याला हरताळ फासण्यासाठी महायुतीचे नेतेच जणू कामाला लागले.

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ
Shirsat vs Gaikwad: काँग्रेसचा मुख्यमंत्री नको असेल; महिला मुख्यमंत्रिपदावरून शिरसाट आणि गायकवाड यांच्यात जुंपली

महायुतीचं हे बेताल त्रिकुट आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. शिंदे गटाचेच प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचं. फडणवीसांनी बजावल्यानंतरही भाजपचे अमरावतीतले राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंनीच हिट विकेट दिलीय..राहुल गांधींवर टीका करण्याच्या नादात थेट राहुल गांधींच्या जीभेला चटके द्या असं वादग्रस्त विधान केलंय.

महायुतीतले सर्वात वादग्रस्त आमदार असलेल्या संजय गायकवाडांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांला मी 11 लाखांचं बक्षिस देईन असं वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. अर्थात यानंतर त्यांनी जे काँग्रेस कार्यकर्ते माझ्या कार्यक्रमात गोंधळ घालतील त्यांना गाडून टाकेन अशी धमकीही दिली. मात्र गायकवाडांवर मुख्यमंत्र्यांनी मात्र मौन बाळगलंय.

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ
Assembly Election: महायुतीच्या जागावाटपाची डेडलाईन ठरली; अमित शहा सोडवणार तिढा?

यानंतर या बेताल त्रिकुटात नंबर येतो तो शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते, सिडकोचे अध्यक्ष, आमदार संजय शिरसाट यांचे. शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना चांगलीच जीभ घसरली होती. काय म्हटले होते पाहूयात.

भाजप खासदार अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करण्याची हाक दिलीय. दिल्लीचं तख्त राखणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातील टिकेचा स्तर किती खालावला हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलं. महायुती..अनेक दिग्गज नेत्यांनी युक्त.. भरभक्कम नेत्यांचा समावेश असलेल्या या महायुतीत सगळ्याच मातब्बर नेत्यांची गर्दी. आणि म्हणूनच या इतक्या नीच्च पातळीची वक्तव्य करुन गर्दीत चमकण्याचा हा नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मात्र वरिष्ठ नेत्यांनी खालावणा- या राजकीय संस्रकृतीला चाप लावायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com