Nitin Gadkari Fainted on Stage of Yavatmal Saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari Health : नितीन गडकरींना प्रचारसभेतच भोवळ; बरं वाटताच काही वेळानं पुन्हा त्याच स्टेजवर भाषण, VIDEO

Yavatmal News | Nitin Gadkari Fainted on Stage: भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. यवतमाळच्या पुसदमध्ये ही घटना घडली.

Vishal Gangurde

यवतमाळ (Yavatmal News)

देशभरात लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरु आहे. याचदरम्यान देशातील बहुतांश भागात पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. या कडक उन्हातच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरु आहेत. अशाच एका भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. यवतमाळच्या पुसदमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी हे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली. यवतमाळच्या पुसदमध्ये अर्चना पाटील यांची प्रचारसभा होती. या प्रचारसभेत नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले. भाषणाच्या काही मिनिटानंतर गडकरी यांना भोवळ आली.

गडकरींना भोवळ आल्यानंतर स्टेजवरील कार्यकर्ते मदतीला धावले. त्यांनतर त्यांना स्टेजवरून उपचारासाठी बाजूला नेलं. भोवळ आल्यानंतर त्यांनी काही वेळ विश्रांती केली. त्यानंतर गडकरी यांची प्रकृती स्थिर झाली. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर गडकरी पुन्हा भाषणाला उभे राहिले.

अन् गडकरी पुन्हा भाषणाला उभे राहिले

नितीन गडकरी यांना प्रचारसभेत भाषण करताना अचानक भोवळ आली. त्यानंतर कार्यकर्ते मदतीला धावले. गडकरी यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. भोवळ आल्यानंतर काही वेळातच बर वाटू लागले. त्यानंतर गडकरी पुन्हा भाषणासाठी मंचावर आली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर गडकरी यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

गडकरींना या आधी देखील भोवळ

नितीन गडकरी यांना आधी देखील भाषणादरम्यान भोवळ आली होती. काही महिन्यांपूर्वी शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai Metro: मुंबईकारांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा मेट्रो होणार ६ डब्यांची, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; काय आहे प्लान?

SCROLL FOR NEXT