वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे:  पृथ्वीराज चव्हाण
prithviraj chavansaam tv

Maharashtra Politics: वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे: पृथ्वीराज चव्हाण

Vanchit Bahujan Aghadi: वंचितमुळे मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरची जागा गेली आहे. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
Published on

Prithviraj Chavan:

वंचितमुळे मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरची जागा गेली आहे. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. सोलापूरमध्ये आज पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहे.

ते म्हणाले की, ''वंचितने महाविकास आघाडीमध्ये यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले,दोन्ही बाजूने प्रयत्न झाले, हे खरं नाहीये. मी कधीही त्यांच्याकडे गेलो नाही आणि त्यांची वेळ मागितली नाही, त्यामुळे हे खोटं आहे. जगावटपामध्ये माझा कांही रोल नव्हता.आमची तीन लोकांची समिती होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सभागृह नेते होते. त्यामुळे मी त्याच्याकडे जाणे, त्यांची वेळ मागणे आणि त्यांना विनंती करणे हे ते कशाच्या आधारावर बोलतायत माहिती नाही.''

वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे:  पृथ्वीराज चव्हाण
Narendra Modi : काँग्रेसकडून होणारी लूट जिंदगी के साथ भी, बाद भी...'; वारसा करावरून PM नरेंद्र मोदींचा प्रहार

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''सोलापूरमध्ये वंचितच्या उमेदवाराने माघार घेतलीय, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. 2019 मध्ये मोदींच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असताना, अनेक उमेदवार उभे करून विरोधीपक्षाची मत विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळे सोलापूरसह 7 जागांवर आमचं नुकसान झालं आणि भाजपचे खासदार निवडून आले. एका ठिकाणी तर एमआयएमचा खासदार ही निवडून आला.''

ते म्हणाले, ''भाजपला फक्त ३० टक्के जनाधार आहे. ७० टक्के विरोध असताना ही भाजप निवडून येते, कारण विरोधी पक्षाच्या मतांच विभाजन करण्यात ते यशस्वी होतात. म्हणून यावेळेला एमआयएमने वंचितची साथ सोडली. २०१९ मध्ये वंचित आणि एमआयएम आघाडीला 7 टक्के मत मिळाली. आता एमआयएम सोडून गेल्यामुळे वंचितकडे ३ टक्के मत राहिली आहेत.''

वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे:  पृथ्वीराज चव्हाण
CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात

चव्हाण पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे फार मोठे नेते आहेत. एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांची वेळ मागावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी एवढी माझी उंची नाही. माझी आंबेडकरी जनतेला विनंती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मतदान केल्यामुळे कुठल्या पक्षाला फायदा होतो? आज एकतर इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल किंवा मोदी पंतप्रधान होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com