Sindhudurg , Nitesh Rane, Vaibhav Naik, NCP, Shiv Sena saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result 2023 : काेकण आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला : राणे; प्रतिष्ठेच्या लढाईत वैभव नाईकांचा करिष्मा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या सर्व निकालानंतर भाजपच नंबर 1 वर असेल असा दावा आमदार नितेश राणेंनी केला हाेता.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Kankavali News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचयात निवडणुकीची निकालात 24 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १५ ठिकाणी विजय मिळविला आहे. त्यापाठाेपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे. या बराेबरच अपक्षांनी तीन ठिकाणी विजय संपादन केला आहे. त्याव्यतिरक्त अजित पवार गट आणि शरद पवार गट या दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. (Maharashtra News)

कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील देवगड आणि कणकवली मधील अकरापैकी आठ ग्रामपंचायती भाजपाने, दोन ग्रामपंचायती उद्धव ठाकरे सेनेने तर एक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने मिळवली आहे.

या मतदारसंघात नितेश राणेंचं वर्चस्व कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. या विजयानंतर आमदार नितेश राणेंनी काेकण आता भाजपचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले. दरम्यान कणकवली तालुक्यातील प्रतिष्ठेची बेळणे ग्रामपंचायत भाजपकडून ठाकरे सेनेने हिसकावून घेतली आहे

कणकवलीत तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत (belne grampanchayat) ठाकरे गटाकडे गेली आहे. ही निवडणूक नितेश राणे यांनी प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणी पुर्वी भाजपची सत्ता होती मात्र ठाकरे शिवसेनेने येथे मोठा विजय मिळवत नितेश राणेंना धक्का दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी विजयी सरपंच व सदस्यांनी कणकवलीत आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांच्या निवासस्थानी दाखल होत एकच जल्लोष केला. आमदार वैभव नाईक यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

सिंधुदुर्ग जिल्हा निकाल (ग्रामपंचायती २३ आणि 1 बिनविरोध. एकुण : 24

भाजप १५ विजयी

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ६

इतर 3

शिवसेना शिंदे गट 0

अजित पवार गट 0

शरद पवार गट 0

काँग्रेस 0

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT