nitesh rane news  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Political News : मराठी भाषा वादात आता भाजपने उडी मारली आहे. मंत्री नीतेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे.

Vishal Gangurde

महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषा वाद वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्यावरून मिरा-भाईंदरमधील परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केली होती. व्यापाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर मिरा-भाईंदरमधील परप्रांतीय व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. आता या वादात हिंदूत्वाची एन्ट्री झाली आहे. मराठी भाषेच्या आडून गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय,असा शब्दात मंत्री नीतेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर प्रहार केला आहे.

मंत्री नीतेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना मिरा-भाईंदर प्रकरणावरून ठाकरे गट आणि मनसे पक्षांवर जोरदार टीका केली आहे. 'मारहाण करणाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. ज्यांनी हिंदूंवर हात उचलला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल'.

ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हणाले, 'मराठी भाषेच्या नावाने गरीब हिंदूंवर हल्ला केला आहे. ठाकरे बंधूंनी आता मुस्लिमांना मराठीत अजान वाचण्यास सांगावं. नळ बाजार, भिंडी बाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हिंमत दाखवावी. त्या भागात कोणीही मराठी बोलत नाही. तिकडे उर्दूशिवाय कोणती भाषा बोलत नाही'.

'मुंब्रामध्ये जाऊन मराठी बोलायला सांगायचं कोणी धाडस करत नाही. मुंब्रा महाराष्ट्रात नाही का? ते पाकिस्तानात आहे का? जावेद अख्तर यांना कोणी मराठीत शायरी बोलायला सांगाल का? तेव्हा सर्व जण शांत असतात. हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. गरीब हिंदूंना मारहाण केली जात आहे, अशी टीका राणेंनी केली.

'महाराष्ट्रातील मराठी लोक देखील या लोकांच्या विरोधात आहेत. या लोकांकडून हिंदू राष्ट्रात फूट पाडण्याचं काम सुरु आहे. हे लोक दहशतवादी संघटनांना मदत करत आहेत. हिंदूंनी या सरकारची स्थापना केली आहे. हिंदुत्वाच्या विचाराचं हे सरकार आहे. कोणी हिंमत केली तर सरकार तिसरा डोळा उघडेल', असेही राणे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अफवावर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र

Genelia Deshmukh: विलास देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाजपची भाषा; रितेशनंतर बायको जेनेलियाची खास पोस्ट

Shocking: लग्नाला दिला नकार, महिला डॉक्टरची आत्महत्या; विषारी इंजेक्शन घेत संपवलं आयुष्य

Pear Benefits: रोज १ पेर खाल्याने या ४ समस्या होतील कायमच्या दूर

ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न, निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ, नेमके काय घडले?

SCROLL FOR NEXT