Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

manisha kayande Latest News : पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात येतोय. मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे. समतेच्या वारीला नक्षलवादाचं लेबल कशासाठी लावलं जातयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टममधून...
pandhari
Ashadhi Wari PandharpurSaam Tv
Published On

पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारीला आनंद आणि शांतीचा सुखसोहळा म्हटलं जातं... मात्र याच वारीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा दावा विधानपरिषदेत शिंदे सेनेच्या आमदार मनिषा कायंदेंनी केलाय. तर सरकारनंही कायंदेंच्या वक्तव्याच्या आधार घेत चौकशी करुन कारवाईचा इशारा दिलाय.

pandhari
Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

खरं तर राज्यात विशेष जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे. यामध्ये अर्बन नक्षलवादाचा उल्लेख करण्यात आलाय. तोच धागा पकडून कायंदे वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एवढंच नाही तर संतांनी सुरु केलेल्या वारीच्या मूळ संकल्पनेवरच सरकार घाला घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

pandhari
Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

खरंतर पंढरीच्या वारीला समतेची वारी म्हटलं जातं.. कारण वारीत कुठलाही वारकरी हा स्वतःची जात-पात, धर्म, पंथ, प्रांत या सगळ्या गोष्टी विसरुन भक्तीरसात डुंबलेला असतो... वारीत प्रत्येकजण फक्त माऊली असतो....त्यामुळेच संत तुकाराम महाराजांच्या शब्दात वारी म्हणजे, संत संग सर्वकाळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ... आता अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली बदनाम केला जातोय.... त्यामुळेच या भक्तीच्या वारीत आपला राजकीय अजेंडा रेटणाऱ्यांनी वारीला बदनाम न करता वारीचं पावित्र्य जपायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com