Nitesh Rane, Manoj Jarange Patil saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane On Manoj Jarange : मनाेज जरांगे पाटलांची राजकीय भाषा सुरू : नितेश राणे

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : मनाेज जरांगे पाटील यांनी कालपासून राजकीय भाषा सुरू केली आहे. त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला (maratha aarakshan andolan) गालबोट लावू नका असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. आमदार नितेश राणे यांनी आज (बुधवार) सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी राज्य सरकार हे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार असल्याचे नमूद केले.  (Maharashtra News)

राणे म्हणाले आज सकाळी संजय राऊत (sanjay raut) आजच्या सर्व पक्षीय बैठकीवर थयथयाट करताना दिसले. एका बाजूला घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजुला सरकारच्या बैठकीसाठी नाक रगडत फोटोसाठी त्यांना आणि मालकाला (उद्धव ठाकरे) यावं लागते. (nitesh rane latest marathi news)

आजच्या बैठकीला ह्यांना बोलावलं नाही त्याबद्धल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द झाले तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही. तुमच्या घरातून सुरवात करा तुम्ही राजीनामे द्या मग दुसऱ्यांचे राजीनामा घ्या.

दरम्यान राजीनामा देतो असे बोलण्याची हिम्मत ठाकरे करतील का? असा सवाल करत राणेंनी बाळासाहेबांचे वारस असाल तर आजच्या बैठकीत आर्थिक निकषावर आरक्षण द्या हे तुम्ही बोलाल का? असा सवाल राणेंनी (nitesh rane) केला आहे.

मनाेज जरांगे पाटलांना कालपासून राजकीय भाषा सुरू केली आहे. 307 लावले तर आम्ही बघून घेऊ असे म्हणण्यासाठी त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावू नका असे नितेश राणेंनी म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील यांनी मी आश्वासन देताे जे निरपराध आहेत त्यांनी घाबरू नये. हिंसेला समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू असेही राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT