Hingoli
Hingolisaam tv

Truck Catches Fire : राष्ट्रीय महामार्गावर संत्र्याचा ट्रक पेटला, फायर ब्रिगेड दाखल; दहा लाखांचे नुकसान

फायर ब्रिगेड घटनास्थळी पाेहचले परंतु ताेपर्यंत उशिर झाला हाेता.
Published on

Hingoli News : हिंगोली शहरानजीक गारमाळ गावाजवळ एका ट्रकने अचनाक पेट घेतला. या घटनेत लाखाे रुपयांची संत्री जळून खाक झाली आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पेटलेल्या ट्रकची आग विझविण्यासाठी हिंगाेली फायर ब्रिगेडने प्रयत्न केले परंतु ताेपर्यंत उशिर झाला हाेता. (Maharashtra News)

Hingoli
Antarwali Sarati News : उदयनराजे भाेसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपाेषण स्थगित करणार? (पाहा व्हिडिओ)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अमरावतीहून हैद्राबादला जाणारा ट्रक हिंगाेलीनजीक राष्ट्रीय महामार्गावर पेटला. दरम्यान ट्रकने अचनाक पेट घेतल्याने चालकाने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ट्रकमधून बाहेर उडी मारली.

त्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर ट्रकमधून स्फाेट झाला. फायर ब्रिगेड घटनास्थळी पाेहचले परंतु ताेपर्यंत ट्रक जळाला हाेता. या घटनेत ट्रक मधील आठ ते दहा लाख रुपयांची संत्री जळून खाक झाली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पाेलीस या घटनेचा तपास करीत आहे. दरम्यान संत्री जळाल्याने शेतक-याचे व ट्रकच्या मालकाचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी अहवाल पाेलीसांनी तयार केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Hingoli
Sugarcane : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'या' साखर कारखान्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com