Narayan Rane, manoj jarange patil saam tv
महाराष्ट्र

Maratha Or Kunbi : मराठा की कुणबी? नितेश राणेंनी दिले मनोज जरांगेंना चर्चेचे निमंत्रण

प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असे आमदार नितेश राणे यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Maratha Reservation : नारायण राणेंनी (narayan rane on kunbi certficate) वास्तुस्तिथी मांडली ती त्यांची चूक आहे का? मी मनाेज जरांगे - पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांना चर्चेचे निमंत्रण देताे. तुम्ही आमच्याकडे या आपण समाज हितासाठी नारायण राणे यांच्याशी चर्चा करुया असे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी मनाेज जरांगे - पाटील यांना आवाहन केले आहे. नितेश राणे हे सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बाेलत हाेेते. (Maharashtra News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आणि कुणबी हे एकच नसल्याचे मत व्यक्त केले. यामध्ये राणेंनी मी मराठा आहे. मी आयुष्यभर कुणबी दाखला घेणार नाही असेही राणेंनी नमूद केले. राणेंच्या वक्तव्यानंतर मराठा समाजातील काहींनी समाज माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.

आज माध्यमांनी याविषयावर आमदार नितेश राणे यांना छेडले असता त्यांनी आमचे सरकार आरक्षण देणारच आहे असे स्पष्ट केले. राणे म्हणाले समाज माध्यमातून राणे साहेबांचे अभिनंदन देखील हाेत आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.

राणे साहेबांनी जे सल्ले दिलेत ते समाजाने ते स्वीकारले आहेत. सर्वांनी एकत्र बसावं पाटीलांनी आमच्या घरी यावं समाज बांधव म्हणून एकत्र बसू असेही नितेश राणे यांनी नमूद केले. ते म्हणाले मी त्यांना आमंत्रित करताे. आपण नारायण राणे यांच्याशी चर्चा करु. त्यांचे मार्गदर्शन घेऊ. समाज बांधव म्हणून एकत्रित मार्ग काढू शकताे असे राणेंनी नमूद केले.

दरम्यान आज मनाेज जरांगे पाटील यांची राजगुरुनगर येथे सभा हाेणार आहे. या सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, नारायण राणे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविराेधात घाेषणाबाजी केली.

दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी कुणबी काही तुच्छ नाहीत. शेतकरी आहेत. आज संपूर्ण विदर्भात कुणबी आहेत, त्यांना तुच्छ मानलं जातं नाही असे म्हटले.

आमदार राेहत पवार (mla rohit pawar) म्हणाले राणे आणि त्याचे चिरंजीव बोलत आहेत. मराठा हा मराठा असतो उगाच काही बोलायच नसते. हे सर्व राज्यकर्ते आहेत ते भाजपवाले मुद्दाम मराठा वाद निर्माण करत आहेत. बाहेरून घेतलेल्या नेत्यांना भाजप सांगत अस अस बोला, समाजात वाद घालू नये सरकार यात कमी पडत आहे असे पवारांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT