nitesh rane criticizes rahul gandhi on panauti word utter to pm modi saam tv
महाराष्ट्र

Panuati : पनवती काेण? माेदी राष्ट्रपिता, गांधी कुटुंबियांवर नितेश राणेंचा हल्लाबाेल (पाहा व्हिडिओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारत हरला असे काॅंग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटले हाेते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News :

भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना हरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे मनाेबल वाढवले. त्यांना धीर दिला. देशाचा पालक कसा असताे, राष्ट्रपिता कसा असताे हे पंतप्रधान नरेंद्र माेदी (PM Narendra Modi) यांनी दाखवून दिले असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नमूद केले. माेदींवर टीका करणारे काॅंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना देशप्रेम काय कळणार असेही राणेंनी म्हटले. (Maharashtra News)

काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांच्या वक्तव्याचा दाखल देत नितेश राणे म्हणाले त्यांच्या म्हणण्यानूसार १९ नाेव्हेंबर म्हणजे इंदिरा गांधी यांची जयंती (indira gandhi jayanti) त्यादिवशी भारत जिंकला पाहिजे होता. मग खरी पनवती (panauti) काेण असा सवाल राणेंनी केला.

राणेंनी पुढे बाेलताना गांधी कुटुंबियांमुळे देशाला 60 ते 70 वर्षांपासून पनवती लागली हाेती. ती पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यामुळे 2014 मध्ये दूर झाली आहे. देशाचा पालक कसा असताे ते त्यांनी क्रिकेटपटूंना (indian cricket team) भेटून दाखविले. ख-या अर्थाने माेदी हे राष्ट्रपिता असल्याचे राणेंनी म्हटले. जो आपल्या देशाचा नाही. त्या राहुल गांधींना देशप्रेम कधीच कळणार नाही असेही राणेंनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

SCROLL FOR NEXT