Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg : हे दादागिरी करताहेत! राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणीपुर्वी सरकारी वकील घरत यांचा गंभीर आराेप

आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणेंच्या नियमीत जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. (Nitesh Rane Bail Updates) सरकारी वकील प्रदीप घरत आणि सतीश मानशिंदे यांच्यात युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी यासाठी सांगितलेली कागदपत्रे पूर्ण केली का? न्यायालयाने सरकारी वकील प्रदीप घरत यांना विचारलं?

आम्हाला ४ दिवस वाया घालवायचे नाहीत कारण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे हे राजेवर गेलेत असा मुद्दा राणेंचे वकील सतीश मानशिंदे यांनी मांडला. अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आमच्याकडे काही डॉक्युमेट द्यावेत अशी मागणी ही सतीश मानशिंदे यांनी केली. यावेळी मानशिंदेंनी त्यांची बाजू भक्कम मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आम्हाला बोलूतर द्या असे म्हटले. आम्हाला कोणत्याही कोर्टात सुनावणीला काहीच हरकत नाही. मात्र आजच सुनावणी घ्या असं राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी देखील नमूद केले. यावेळी दाेन्ही बाजूच्या वकीलांनी त्यांची बाजू न्यायालयापुढं जाेरदार मांडली. यावेळी एका क्षणी हे दादागिरी करताहेत असा गंभीर आराेप विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणेंच्या वकीलांवर केला. दरम्यान आता जामीन अर्जावर प्रत्यक्ष सुनावणी सुरु झाली आहे. (Nitesh Rane Latest Marathi News)

शिवसेनेचे कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपुर्वी हल्ला झाला हाेता. या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत. आज (मंगळवार) राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. आज राणेंना न्यायालयात जामीन मिळणार की त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार याकडे सा-या जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. (Nitesh Rane Bail Updates).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT