maratha kranti morcha, maratha reservation, nilesh rane, yuvraj sambhajiraje chhatrapati, aurangabad saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : 'छत्रपतींच्या गादीचा आदर आहे पण मी ठरवली तीच दिशा हे योग्य नाही'

पुढील बैठक औरंगाबाद येथे घ्यावी अशी मागणी देखील असा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

- नवनीत तपाडिया

Maratha Reservation : औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोण नेतृत्व करणार असेल तर त्यांना सगळ्यांना घेऊन भूमिका मांडणे गरजेचे आहे. ठराविक लोकांना घेऊन काम होणार नाही तर बिघडेल, छत्रपतींच्या गादीचा आदर आहे पण मी ठरवली तीच दिशा हे योग्य नाही असं ट्विट आज माजी खासदार निलेश राणेंनी (nilesh rane) केली आहे. राणेंच्या ट्विटचा (tweet) राेख संभाजीराजे छत्रपतींवर असल्याचं दिसून येत आहे.

औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती संभाजीराजे (yuvraj sambhajiraje chhatrapati) आमचे नेतृत्व करु शकत नाही. आम्ही फक्त गादीचा सन्मान करतो. आमचे मार्गदर्शक फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी छत्रपती संभाजीराजेंनी त्यांचा पक्ष सांभाळावा असा सल्ला देखील दिला. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर काहीही चर्चा झाली नाही जे खरे कार्यकर्ते आहेत. त्यांचे ऐकले देखील नाही असेही पदाधिका-यांनी नमूद केले.

दरम्यान संभाजीराजेंनी आमचे नेतृत्व करू नये. मराठवाड्यातील मराठा समाज आजही वंचित आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाचा हिताचा निर्णय घ्यावा. तसेच पुढील बैठक औरंगाबाद येथे घ्यावी अशी मागणी देखील असा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची भूमिका योग्य असल्याचं मत माजी खासदार निलेश राणेंनी म्हटलं आहे. त्याबाबतचे ट्विट राणेंनी केले आहे. ते लिहितात कोण नेतृत्व करणार असेल तर त्यांना सगळ्यांना घेऊन भूमिका मांडणे गरजेचे आहे. ठराविक लोकांना घेऊन काम होणार नाही तर बिघडेल, छत्रपतींच्या गादीचा आदर आहे पण मी ठरवली तीच दिशा हे योग्य नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT