‘दोस्त दोस्त ना रहा...’ गाणं ऐकवल्यावर किशोरी पेडणेकरांना झाली भाजपच्या 'या' नेत्याची आठवण

किशोरी पेडणेकर यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.
Kishori Pednekar
Kishori Pednekar Saam Tv
Published On

मुंबई - झी मराठी वाहिनीवर 'बस बाई बस' हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर, पंकजा मुंडे या सहभागी झाल्या आहेत. आता या कार्यक्रमात माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) हजेरी लावणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. या शोमध्ये प्रश्न विचारण्याबरोबरच या मनोरंजनात्मक खेळही खेळले जातात. याच कार्यक्रमाच्या एका गाण्याचा कमाल खोल रंगला. ज्यात किशोरी पेडणेकर यांना गाण्याचे बोल ऐकून समोर कोणाचा चेहरा येतो हे सांगायचे होते.

किशोरी पेडणेकरांनाही काही गाणी ऐकवली गेली. यापैकी ‘कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू’ हे गाण्याचे बोल ऐकल्यानंतर कोण आठवतं, असा प्रश्न सुबोध भावे यांनी विचारला त्यावर किशोरी पेडणेकर भाजपाच्या चित्रा वाघ यांचा चेहरा डोळ्यासमोर येत आल्याचं उत्तर दिलं. किशोरी पेडणेकर यांचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Kishori Pednekar
Satara News : पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा एसीबीनं लिपिकास पकडलं

त्यानंतर त्यांना ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणंही ऐकवण्यात आलं. हे गाणं ऐकताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. ‘बस बाई बस’ कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांच्या आधी भाजपा दरम्यान, याआधी या शोमध्ये पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे आणि अमृता फडणवीसही सहभागी झाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com