Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाला द्या १० दिवस 'या' पदार्थांचा नैवेद्य, होतील सर्व मनोकामना पूर्ण

दररोज बाप्पाला या प्रकारचा नैवेद्य द्या
Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022Saam Tv
Published On

Ganesh Chaturthi 2022 : ३१ ऑगस्टपासून सुरु होणारा हा गणेश उत्सव आपल्या प्रत्येकासाठी खास असतो. बाप्पाचे आगमन घरोघरी होते व त्यांना या १० दिवसांत वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. त्यात काही खाण्यापिण्याचे देखील पदार्थ असतात. परंतु, दररोज बाप्पाला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य द्यायचा या चिंतेत आपण असतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला त्याची यादी आज देणार आहोत. ज्यामुळे बाप्पाला आपल्यावर खुश होऊन आपल्यावर प्रसन्न होतील.

Modak
ModakCanva

अनेक नैवद्यांपैकी मोदक हा बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. यासाठी आपण बाप्पाला विविध प्रकाराचे मोदक प्रसादात ठेवू शकतो.

Motichur Ladu
Motichur LaduCanva

मोतीचुरचा लाडू हा बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण नैवेद्यात ठेवू शकतो. त्यासाठी आपण हे घरी देखील बनवू शकतो.

Besan Ladu
Besan LaduCanva

तुपात बनवलेले बेसन लाडू खूप छान लागतात, बाप्पाला त्याच्या नैवेद्यात ते नक्कीच आवडतील! गणेशोत्सवात तुम्ही एक दिवस बाप्पाला बेसनाचे लाडू अर्पण करू शकता.

Puran Poli
Puran PoliCanva

गणेश चतुर्थीला बनवलेला हा एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. पुरणपोळीचा नैवेद्य आपण गौरी पूजनाच्या दिवशी आपण बापाला ठेवू शकतो.

Rice Kheer
Rice KheerCanva

बासमती तांदूळ, दूध, साखर, ड्रायफ्रुट्स, केशर आणि वेलची यापासून बनवलेली तांदळाची खीर नैवेद्यसाठी चांगली आहे. आपण ती सहज तयार करू शकतो.

Shreekhand
Shreekhand Canva

श्रीखंड हे दह्यापासून बनवलेले पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे. त्याची चव केशर आणि वेलचीने आणखी वाढवता येते. तुम्ही बाप्पाला संपूर्ण श्रीखंड अर्पण करू शकता.

Basundi
BasundiCanva

बासुंदी म्हणजे गोड केलेले कंडेन्स्ड दूध, वेलची आणि जायफळ सह सुक्या मेव्याची चव. ही दुधावर आधारित गोड भारताच्या पश्चिम भागात खूप प्रसिद्ध आहे.

Til ladu
Til laduCanva

तीळ, गूळ, शेंगदाणे आणि सुके खोबरे यापासून तयार केला जाणारा तिळाचा लाडू. आपण याचा देखील प्रसाद बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवू शकतो.

Kalkand
KalkandCanva

दुधाचे मिश्रण करून बनवलेले कलाकंदही अगदी चवीने खाल्ला जातो. चांगली गोष्ट अशी आहे की यामध्ये साखरेचा कमी प्रमाणात वापर करता येतो.

payasam
payasam Canva

पायसम नारळाचे दूध (Milk) आणि गुळापासून बनवले जाते. ही एक प्रकारची खीर आहे जी केरळ तांदूळ आणि कोकणी तांदूळ यापासून पायसम बनवले जाते. याची चव देखील वेगळी लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com