हायवेवर स्थानिकांना टोल फ्री प्रवास करता येणार का? NHAI चा नियम जाणून घ्या meta ai
महाराष्ट्र

Toll Free : हायवेवर स्थानिकांना टोल फ्री प्रवास करता येणार का? NHAI चा नियम जाणून घ्या

Toll Rules : केवळ ओळखपत्र दाखवून टोलनाक्यावरून मोफत प्रवास करता येत नाही. २० किमीच्या परिसरातील पात्र वाहनधारकांसाठी मासिक Local Passची सुविधा उपलब्ध NHAI चा नियम जाणून घ्या

Saam Tv

हायवेवर प्रवास करताना प्रत्येकाला टोल भरणे अनिवार्य असते. पण टोल नाक्याजवळ ज्यांची घर आहेत त्यांच काय? अशा लोकांना भरावा लागतो कि नाही? की हे लोक फक्त ओळख पत्र दाखवून प्रवास करतात ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण यावर आता NHAI ने स्पष्टीकरण देत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. NHAI म्हणजेच नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण देत एक पोस्ट केली आहे. टोल नाक्याजवळ राहणाऱ्या लोकांना केवळ ओळखपत्र दाखवून प्रवास करता येत नाही. असे या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

टोलनाक्याजवळ राहणाऱ्या लोकांना लाभ कसा मिळतो ?

टोलनाक्याजवळ राहणाऱ्या सगळ्याच लोकांना याचा लाभ घेता येत नाही.जे लोक टोलनाका किंवा टोलनाक्याच्या आसपास 20 किमी अंतराच्या क्षेत्रात येतात, त्या लोकांनाच टोलमधे सवलत दिली जाते. अशा लोकांना महिन्याला पास दिला जातो. तो पास दाखवूनच या सवलतीचा लाभ घेता येतो.

  • जर तुम्ही टोलनाक्याच्या आसपास राहत असाल तर तुम्हाला दरमहा टोल पास बनवणे गरजेचे आहे.

  • हा पास तुमच्याजवळ असेल तरच तुम्हाला टोलनाक्यच्या विशेष सवलतींचा लाभ घेता येईल.

  • याशिवाय या टोल पाससोबत जोडलेल्या नियमांचे पालन करणे, वेळोवेळी माहिती ठेवणे गरजेचे आहे.

हा दरमहा पास कसा मिळवायचा?

  • जर तुमचे घर टोलनाक्याच्या जवळ असेल तर या दरमहा पासच्या सवलतीचा लाभ तुम्ही घ्यायलाच हवा.

  • सर्वात आधी Rajmargysyatra हा अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा.

  • रजिस्टर मोबाइल नंबर टाकून लॉगिन करा.

  • मग अॅपमध्ये लोकल पास हा ऑप्शन निवडा.

  • पुढे Digilocker किंवा VAHAN अॅपच्या माध्यमातून आपला घराचा पत्ता आणि वाहनाचे सर्व डिटेल्सची माहिती भरा.

  • यानंतर या अॅपमध्ये असलेल्या GIS सुविधेमुळे तुम्हाला कळेल की तुमचे घर टोलनाक्याच्या 20 किमी क्षेत्रात आहे की नाही.

  • जर घर 20 किमीच्या आत असेल तर तुम्ही पास काढू शकता. मग हा लोकल पास तुमच्या FASTAG सोबत डायरेक्ट जोडला जातो.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT