High Blood Pressure : हाय बीपीच्या औषधामुळे होतोय कॅन्सर, WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

Health Alert : बीपीच्या गोळ्यांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचा दावा WHO ने व्यक्त केला आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
High Blood Pressure : हाय बीपीच्या औषधामुळे होतोय कॅन्सर, WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट
High Blood Pressure : हाय बीपीच्या औषधामुळे होतोय कॅन्सर, WHO चा धडकी भरवणारा रिपोर्टmeta ai
Published On

बीपीच्या गोळ्या घेत असाल वेळीच सावध व्हा. कारण या गोळ्यांमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यासंबंधित जागतिक आरोग्य संघटनेचा एक खळबळजनक रिपोर्ट जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार कॅन्सरचा धोका हा बीपीच्या गोळ्यांमध्ये असलेला हाइड्रोक्लोरोथायाजाइडमुळे अधिक वाढण्यची शक्यता असते. त्यामुळे बीपीच्या गोळ्या खाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट

जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संस्थेने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार बीपीच्या गोळ्यांमध्ये हाइड्रोक्लोरोथायाजाइड, व्होरिकोनाझोल आणि टॅक्रोलिमस यांचा समावेश असतो. बीपी सोडून ही औषधे इतर आजारांसाठी देखील वापरली जातात. WHO ने जाहीर केलेल्या या रिपोर्टनुसार या गोळ्या माणसाच्या शरीरात कॅन्सर निर्माण करण्यासाठी पुरेश्या आहेत. मात्र ही औषध घेणाऱ्या प्रत्येकालाच कॅन्सरची लागण होईल असे ठामपणे सांगता येत नाही. प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वेगळी असल्याने याचे दुष्परिणाम कोणावर कसे होतील हे सांगणे कठीण आहे. परंतु या गोळ्या खाताना वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

High Blood Pressure : हाय बीपीच्या औषधामुळे होतोय कॅन्सर, WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट
Children Myopia : लहान वयातच मुलांना चष्मा का लागतोय? डॉक्टरांनी सांगितलेली ‘ही’ कारणं पालकांनी वेळीच जाणून घ्या

हाइड्रोक्लोरोथायाजाइड घेत असाल तर सावधान

हाइड्रोक्लोरोथायाजाइड हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. हाइड्रोक्लोरोथायाजाइडचा थेट संबंध हा त्वचेच्या कॅन्सरशी असतो. ज्यामध्ये त्वचेचा स्व्वॅमस सेल , कार्सिनोमा आणि ओठांचा कर्करोग यांचाशी संबंधित आहे.याशिवाय अशा गोळ्या घेणारी माणसे जर अति उन्हात राहिली तर त्वचेसंबंधी इतर आजार होण्याची शक्यता असते.

High Blood Pressure : हाय बीपीच्या औषधामुळे होतोय कॅन्सर, WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट
Super Obesity: 209 किलो वजन, श्वास घेणंही अवघड; डॉक्टरांनी 32 दिवसांत असा केला चमत्कार, रुग्णाला मिळालं नवं आयुष्य

व्होरिकोनाझोल म्हणजे काय

व्होरिकोनाझोल हे रक्तदाबाचे औषध नाही. याचा वापर बुरशीसारख्या संसर्गावर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या गोळ्यांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्वचेचा कॅन्सरचा धोका असतो .

टॅक्रोलिमस कशासाठी वापरला जातो

टॅक्रोलिमस याचा वापर साध्या आजारांच्या गोळ्यांमध्ये होत नाही. याचा वापर ज्या रूग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहे त्यांच्यासाठी केला जातो. तो अवयव जर शरीर स्वीकारत नसेल तर टॅक्रोलिमस शरीराची रोगप्रतिकारकशक्ती काही काळ दाबून ठेवण्याचे काम करते. याच्या सेवनाने त्वचेचा कर्करोग किंवा एखाद्या अवयवाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

या गोळ्यांपासून त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे पुरेपुर रक्षण करा. जर तुम्ही देखील या गोळ्यांचा वापर करत असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com