Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मालवण येथे सुंदर तारकर्ली बीच वसलेला आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य आणखी खुलून येते.
तारकर्ली बीच हा येथील अत्यंत स्वच्छ, स्वच्छ निळसर-हिरव्या रंगाचे पाणी, पांढरी वाळू यांच्यासाठी ओळखला जातो. तसेच येथे स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.
कोकणातील सिंधुदुर्ग हे ऐतिहासिक सागरी किल्ले, प्राचीन समुद्रकिनारे, स्कूबा डायव्हिंग साहस आणि अस्सल मालवणी पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे.
तारकर्ली बीचवर स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करता येते. प्रवाळ खडक आणि सागरी जीवसृष्टी पाहण्यासाठी 'डीप-सी डायव्हिंग'ची सुविधा येथे आहे.
तारकर्ली किनारपट्टीच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कारली नदीचे शांत बॅकवॉटर अशी अद्वितीय रचना पाहायला मिळते. नदी आणि समुद्राचा हा सुंदर संगम पाहून मन भारावून जाते.
मालवणी खाद्यसंस्कृतीचा येथे आस्वाद घेता येईल. येथे अस्सल कोकणी मांसाहारी थाळी आणि सी-फूडसाठी प्रसिद्ध आहे.
सिंधुदुर्गला गेल्यावर तेथील सुंदर पिकनिक स्पॉट्सना नक्की भेट द्या. यात सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन (मालवण), सावडाव धबधबा, भोगवे बीच यांचा समावेश आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.