Fort : हाताला आधार नाही, दोन्ही बाजूंना दरी; 'या' किल्ल्याचा शेवटचा टप्पा आहे खूपच खडतर!

Shreya Maskar

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्ग रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ सह्याद्री पर्वतरांगा वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. येथे ट्रेकिंगचा थरार पाहता येतो.

Kalawantin Durg | pinterest

कलावंतीण दुर्गाची उंची

कलावंतीण दुर्ग २,२५० फूट (६८६ मीटर) उंच शिखर आहे. याला 'स्वर्गाकडे जाणारी वाट' असेही म्हटले जाते. कलावंतीण दुर्ग एका मोक्याच्या ठिकाणी असलेल्या टेहळणी बुरुजाच्या (वॉचटावर) उद्देशाने बांधले गेले होते.

Height of Kalavantin Durga | pinterest

खडकातील पायऱ्या

अंतिम चढाईसाठी कड्याच्या बाजूला ६० अंशांच्या कोनात बाहेर आलेल्या आणि हाताने कोरलेल्या तीव्र उताराच्या पायऱ्या चढाव्या लागतात. येथे रेलिंग, दोर किंवा सुरक्षेसाठी कोणताही आधार उपलब्ध नाही.

Steps in the rock | pinterest

निसर्ग सौंदर्य

कलावंतीण दुर्गच्या शिखरावरून माथेरान, चंदेरी, पेब, इर्शाळगड आणि कर्नाळा या किल्ल्यांचे तसेच दूरवरच्या मुंबई शहराचे विहंगम दृश्य दिसते.

Beauty of nature | pinterest

कोणती खबरदारी घ्यावी?

शिखरावर पाणी किंवा विजेची कोणतीही सोय नाही. तसेच, अंधार पडल्यावर तीव्र उताराच्या खडकावरून खाली उतरणे अत्यंत धोकादायक असल्याने, येथे पर्यटकांना सूर्यास्तापूर्वी खाली उतरण्याचा सल्ला दिला जातो.

precautions | pinterest

कसं जाल?

मुंबई किंवा पुण्यावरून जात असाल तर हार्बर लाईनवरील पनवेल स्टेशनला उतरा. पनवेलहून ठाकूरवाडीला जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा/टम-टम भाड्याने प्रवास करा. ठाकूरवाडीपासून ट्रेक सुरु होतो.

how do you go | pinterest

प्रबळमाची पठार

ठाकूरवाडीपासून २ तास चालत प्रबळमाची या मध्यवर्ती पठारावर पोहचाल आणि त्यानंतर प्रबळगड ते कलावंतीण दुर्ग हा अंतिम टप्पा पार करता येतो.

Prabalmachi Plateau | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : ३६ किलोमीटर लांब भिंत! 'या' किल्ल्याची भव्य रचना पाहून व्हाल थक्क

India Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...