BPच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका? जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Shocking Report: BP Medicines Linked to Skin & Lip Cancer, Says WHO : आता बातमी आहे BPच्या गोळ्या घेणाऱ्यांसाठी... BPच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केलाय. मात्र, धोक्याचा इशारा देताना नागरिकांना महत्त्वाचं आवाहनही केलंय... जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात काय म्हटलंय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट..
BP MEDICINES AND CANCER RISK? WHO ISSUES WARNING ON HYPERTENSION DRUGS
BP MEDICINES AND CANCER RISK? WHO ISSUES WARNING ON HYPERTENSION DRUGSsaam tv
Published On

सध्याच्या धावपळीच्या युगात उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या बनलीये. मात्र, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज नियमितपणे गोळ्या घेणाऱ्या लोकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीये. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' म्हणजेच IARC नं जाहीर केलेल्या एका नव्या अहवालामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडालीये. या अहवालात नेमकं काय म्हटलंय? ते पाहूयात...

रक्तदाबाच्या गोळ्यांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केलाय. WHO च्या IARC या कर्करोग संशोधन संस्थेने 3 औषधांमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याचा इशारा दिलाय. औषधांच्या दीर्घकाळ सेवनानं त्वचेचा आणि ओठांचा कर्करोग होऊ शकतो. मात्र, नागरिकांनी परस्पर औषध बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलय...

दरम्यान, बीपीच्या गोळ्यांमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता WHOनं वर्तवली असली तरी तज्ज्ञांनी यासंदर्भात काय म्हटलंय? ते पाहूया... या रिपोर्टमुळे बीपीच्या गोळ्या खाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. मात्र, धोक्याचा इशारा देतानाच WHOनं डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहनही केलंय. त्यामुळे घाबरून न जाता, आपल्या प्रकृतीनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही फॅमिली डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि स्वत:च्या आरोग्याबाबत सतर्क राहणे जास्त हितकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com