Surabhi Jayashree Jagdish
आंबोली हिल स्टेशन महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे कोकण किनारपट्टीकडे जाण्यापूर्वीचं महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण मानलं जातं. समुद्रसपाटीपासून आंबोलीची उंची सुमारे ६९० मीटर आहे.
मडगाव ते आंबोली हे रस्त्याने सुमारे ११४ किलोमीटरचं अंतर आहे. उपलब्ध मार्गानुसार कारने हा प्रवास साधारण दोन तासांच्या आसपास होऊ शकतो. मात्र वाहतूक आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार वेळ बदलतो. त्यामुळे गोव्यातून विकेंड ट्रिपचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांसाठी आंबोली हा सहज पोहोचता येणारा पर्याय ठरू शकतो.
महाराष्ट्रात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर सह्याद्रीच्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आंबोलीचा विचार करता येतो. हिरव्यागार पर्वतरांगा आणि जंगलांनी वेढलेला परिसर याठिकाणी पाहायला मिळतो. पावसाळ्यात डोंगरांवरची हिरवाई आणि धबधबे आंबोलीचे सौंदर्य अधिक खुलवतात.
आंबोली परिसर घनदाट जंगल आणि अनेक धबधब्यांसाठी ओळखला जातो. आंबोली धबधबा बसस्थानकापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात त्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो. नांगरतास धबधबाही आंबोलीजवळील प्रसिद्ध आकर्षण असून तो सुमारे ४० फूट उंचीवरून अरुंद दरीत कोसळतो.
पावसाळ्यात आंबोलीच्या डोंगररांगांवर धुकं दाटून येतं आणि संपूर्ण परिसर हिरवागार दिसतो. पावसाळ्यात आंबोलीमध्ये धुक्याने वेढलेल्या डोंगरांचे आणि वाहत्या धबधब्यांचे दृश्य अनुभवता येते.
आंबोलीच्या जंगल आणि डोंगराळ परिसरात निसर्गभ्रमंती तसंच काही ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. त्यामुळे तुम्ही पुढच्या ट्रिपचा प्लान करत असाल तर याठिकाणी नक्की करू शकता.