New Labour Law Saam Tv
महाराष्ट्र

New Labour Law: ४८ तास काम अन् ३ दिवस भरपगारी सुट्टी; कामगार संहितेत बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra New Labour Codes of 48 Hour Work and 3 Day Leave: राज्य सरकार कामगार संहितेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये ४८ तास काम करा अन् ३ दिवस भरपगारी सुट्टी असा नियम लागू होऊ शकतो.

Siddhi Hande

कामगार संहितेत महत्त्वाचे बदल

४८ तास काम करा अन् ३ दिवस सुट्टी घ्या

राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकार लवकरच नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. यामध्ये कामगारांना ४८ तास काम करायचे आहे आणि पुढचे दिवस त्यांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे. कामागारांनी ३-४ दिवसात ४८ तास काम करायचे आहे. त्यानंतर पुढचे तीन दिवस सुट्टी घ्यायची आहे. कामाचे हे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरणार आहे.

इंग्लंड, फ्रान्स, जपान यांसारख्या देशातील ‘आठवड्यात ४८ तास काम करा आणि सुट्टी घ्या’ ही पद्धत लागू करण्याच्या तयारीत आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांमध्ये बदल करुन कामगार विभाग ही संहिता लागू करणार आहे.

आठवड्यात ४८ तास काम आणि ३ दिवस सुट्टी

देशात दिवसाला आठ दिवस आणि आठवड्याला ४८ तास काम करण्याची मर्यादा आहे. रोज १२ तास काम करण्याची मर्यादा करण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. त्याला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. आठवड्यात कामाचे ४८ तास करुन केंद्र सरकारच्या नवीन संहितेत सुधारणा करण्याचे सरकारने ठरवले आहे. तसेच कामगार विभागाने वेतन संहितेत सुधारणा केली आहे. कामगारांना ठरलेले वेतन मालकाने न दिल्यास ५० हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. नवीन नियमानुसार, महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकाला करावी लागणार आहे. सणासुदीला खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यात जास्त वेळ कामगारांना काम करावे लागते त्यांना दुप्पट बोनस देणे बंधनकारक ठरणार आहे.

राज्यात नवीन कामगार संहिता लागू होणार

गेल्या वर्षी केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द केले आहेत. फक्त ४ कायद्यांमध्ये नवीन संहिता असणार आहे. ही कामगार संहिता तशीच राज्यांना लागू करता येणार नाही. या नवीन संहितेत काही सुधारणा करुन लागू केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

SCROLL FOR NEXT